पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
चांदण्यांतील गप्पा

अशासारखी तिच्या वयाला व सुकुमारपणाला योग्य अशी तिची मदत असे. मानजीरावांचे (हे त्या म्हातान्या गृहस्थाचें नांव ) नित्यकृत्य म्हटले म्हणजे प्रातः- काळी उठून ईश्वरभजन करावयाचें, सुंदर प्रेमळ पर्दे आपल्या नातीला शिकवा- वयाचीं, कांहीं नीतीच्या व बोधप्रद गोष्टी सांगावयाच्या, व उद्योगाचा महिमा किती आहे ते तिच्या मनांत भरवून द्यावयाचें. उजाडल्यावर प्रातःकाळचे नित्य- कृत्य आटोपून मुलीचें स्नान झाले कीं, आपणही स्नान करावयाचें. पुढल्या पटांगणांत एका मोठ्या औदुंबराचे झाडाखाली त्यांनी आपल्या घराप्रमाणेच एक देऊळ बांधिलें होतें. त्यांत ओबडधोबड अशी एक दत्तमूर्ति व नंदी, महा- देव, मारुती व गणपती यांच्या मूर्ति ठेविलेल्या असत. त्यांना पाणी, गंध, फुले वाहून नंतर ती मुलगी सकाळची न्याहारी करी.

 मानाजीराव सारा दिवस तोंडानें देवाचें भजन करीत व सांजसकाळ पूजाअर्चा करीत. ते पहांटे उटून आपली पोथीपुस्तकें वाचीत. १८ अध्याय भगवद्गीता तर त्यांना मुखोद्गत होती. सकाळचें भजन व देवार्चन झाले म्हणजे हत्यारवंद होऊन, मुलीला ( तिचें नांव चंपा होतें ) सांभाळण्याबद्दल खंडूजीला ( हें नांव मानाजीरावांच्या चाकराचें होते ) सांगून, डोंगराच्या पायथ्याशी कांहीं गांव होते तेथल्या बाजारांतून कांहीं जिन्नसपानस आणावयाचे असल्यास ते आणा- वयास जात, व केव्हा केव्हा आपल्या शेतांत काम करीत.

 मानाजीरावांच्या जवळ एक दुभती गाय मात्र असे. शेतकामाला वगैरे ते गुरे बाळगीत नसत. त्यांचा चाकर कुदळीनें जमीन खणून तींत वीं फेंकी. मानाजीराव आपल्या चाकराकडून डोकीवरून पाणी आणून बागाईत जिनसांना घालवीत. त्यांचे शेतभात सर्व त्यांच्या श्रमाचें होतें. आपल्या जमिनींत संसा- राला लागणा-या अत्यावश्यक वस्तु ते तेथेंच निर्माण करीत. ज्यांच्या वाचून अगदी अडे तेवढ्याच ते खालीं आसपासच्या गांवांत जाऊन आणीत. ते काम कधीं कधीं त्यांचा विश्वासू खंडूजीही करी.

 मानाजीरावांचे झोंपडे सुवर्णगिरी पर्वताच्या एका टोंकावर होतें. सुवर्णगिरी मोंगलांच्या ताब्यात होता. मानाजीरावांचें झोंपडें गर्द झाडींत होतें व लागवड. जमिनीच्या भोंवत तेवढे उघडे मैदान होते; परंतु कोणी जाणारा येणारा तेथे