पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

३५

दिले. आनंदाचे हातून इमानाचीं अशीं दुसरी किती तरी कामे झालीं तीं कोठवर सांगावीं !

 आनंदा आतां आपल्या शेटजींचा मुंबईच्या पेढीवरचा मुनीम झाला. त्याचें कम होऊन त्याला दोन लहान लहान मुले झाली होती. मुंबईस त्याने आपल्या कमाईचें एक लहानसें टुमदार घर बांधिलें होतें. त्याचा उपकारकर्ता गयादीन हाही आतां मुंबईस आपल्या नातवंडांचे कौतुक करण्यास आजोबाच्या जाग होता. आनंदाचे आनंदराव झाले. पण तो गयादिनाला कधीं विसरला नाह एवढेंच नव्हे, तर पितृभक्त मुलाप्रमाणे त्यानें त्याची वृद्धापकाळी योग्य सेवाचाकरी केली व त्याच्या माधवप्रसाद मुलाची त्याला यत्किंचितही आठवण होऊं दिली नाहीं.

 पौष शुद्ध द्वितीयेचा दिवस. त्या दिवशीं मकरसंक्रान्त होती. सकाळचे पांच वाजले होते. सागरगडाच्या डोक्यावर शुक्र चांदणी नुक्तीच वर आली होती. ती पाहून असे वाटे कीं, जणुं काय एखाद्या भव्य स्त्रीनें वेणीफणी करून आप ल्या काळ्याभोर केशकलापांत हा हिरेजडित सुंदर दागिनाच घातला आहे. पलीकडचा पूर्वेकडील भाग अरुणप्रभेमुळे तांबडा लाल झाला आहे:- जणुं ती स्त्री कुंकूं लावीत असतां लगवगत पिंजरेचा करंडा खालीं लवंडला व त्यामुळे तो भाग लालभडक झाला ! अथवा, नैनो रक्तचंदन व तांवडी फुलें घेऊन भनवान् दिनमणीला अर्ध्य दिले व त्यामुळेच ती दिशा लाल झाली. पश्चिमेकडे सर्व नक्षत्रगण खाली सरकला होता, जणुं काय हा नवरत्नाचा हार तुटून त्यांतील रत्नें खालीं ओघळत आहेत ! वृक्ष जणुं स्नान करून शुचिर्भूत होऊन नुकतेच ध्यान धरून वसले आहेत; ओढयाचे लहान लहान झरे जणुं आनंदाने भगवन्नामगान गात चालले आहेत; पक्षी एकमेकांना उजाडल्याची इशारत देण्याकरितो मधून मधून किलबिल शब्द करीत आहेत, रात्रभर चाल- ण्याचे श्रम झाल्यामुळे बैलगाडया रेंगाळत मार्ग ऋमित आहेत; मारुतीच्या देवळा- भोंवतालची माणसें नित्यकृत्य करण्यास उठलीं आहेत, व त्यामुळे मोठी ग माजून राहिली आहे; गाई हंबरून वासरांना भेटण्याची उत्सुकता दाखवीत आहेत; माळणी, कोळणी व आगरिणी डोकीवर पांढया घेऊन तोंडानें मंजुळ गाणी गात गाल पोयनाडच्या बाजाराला चालल्या आहेत. अशा वेळी मारुतीच्या देवळापुढे घोडयाचे दोनतीन तांगे येऊन थडकले. एवढ्या सकाळीं घोड्याचे