पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
चांदण्यांतील गप्पा

तो पुष्कळ बोललाही. पण प्रत्यक्ष त्याचें नांव घेण्याचें त्याला धैर्य होईना. शेटजींच्या समक्ष तर आनंदाकडे बघण्याचेसुद्धा त्याच्याने होईना. तुळशीराम याप्रमाणे बडबडत असतां एकदा शेटजींनी दरडावला, व सर्वोचे कपडे घेऊन येण्यास त्यास सांगितलें. तुळशीरामास तेंच पाहिजे होते. तो पळत पळत गेला, व दोघांतिघांचे कोट घेऊन आला. त्यांत आनंदाचाही कोट त्यानें आणला व लगबगीनें तोच कोट मेथाजीपुढे टाकिला. टाकतांच त्यांत रुपये खळ्कन् वाजले. तेव्हां चेहरा थोडा आश्चर्ययुक्त करून मेथाजीकडे त्याने पाहिले. मेथाजी काय काय चमत्कार होत आहेत ते सारखे बघतच होते.

 तुळशीरामाने आनंदाच्या खिशांत हात घालून त्यांतील रुपये काढून मेथा- जीपुढे केले व म्हणाला, ' हा पहा महाराज तुमचा भरंवशाचा आनंदा ! " तुळशीरामाचे बोलणे एवढा वेळ मेथाजी मुकाटयानें ऐकून घेत होते. पण आप णच होऊन आनंदाच्या खिशांत ठेविलेले रुपये मोठ्या इमानीपणाच्या डोलानें बाहेर काढून, बिचाऱ्या आनंदावर आळ आणण्याकरितांच एवढे कपटजाळ पसरून त्यांत त्याला धरण्याची युक्ति आपणास साध्य झाली अशा घमेंडींत तुळशीराम आहे-तोंच त्योस ते एकदम दरडावून म्हणाले: “ बस्स झालें ! तुझी जीभ फार लांबवूं नको गुलामा ! तुझें सर्व कृत्य मला माहीत आहे. मी तुझ्या पाठीवर परवपासून आहे. तूं नाहीं हे रुपये या कोटाच्या खिशांत टाकलस ? " असें म्हणून त्यांनी तुळशीरामाचे दुकानांतील कृत्य शेटजींना पुनः सांगितले. नंतर तुळशीरामानें सांगितल्यावरून आनंदाचें गांठोडें आणलें, तो त्यांत कंठीही पण सांपडली. बिचाया आनंदाने आपले गांठोर्डे कित्येक दिवसांत सोडलें नव्हते. त्याच्या गांठोड्यांत जम्नादासाची कंठी कशी आली, हे त्याला कोहीं- सुद्धां माहीत नव्हतें. तेंही कृत्य आपकेच होते म्हणून तुळशीरामानें कबूल केलें. शेटजींना तर तुळशीरामाचा अतोनात संताप आला. त्यांनी त्याच्या बापास बोलावून त्यास मुलाचें हे सर्व कारस्थान सांगितले, व त्यास काढून टाकले. बाप विचारा काय करणार ? 'एकवेळ क्षमा करा-पुन्हा असा गुन्हा झाला तर काढा. मजकडे बघा ! इत्यादि बोलून त्याने आपल्या धन्याचे पायावर डोके ठेविलें. आनंदालाही ते बरें वाटेना. तोही तुळशीरामाबद्दल शेटजींस विनवू लागला. शेवटीं आनंदाकरितांच, त्याचा भळेपणा पाहून, त्यांनी तुळशीरामास राहूं