पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

३३

 एक दिवस संध्याकाळी मेथाजी आपल्या पेटीच्या किल्ल्या विसरून घरीं आले. त्या आणण्याकरितां त्यांनी आनंदाला पाठविलें. तो अर्ध्या वाटेंत गेला न गेला तोंच कंठीचा वहीम आनंदावर असल्याचे त्यांना स्मरण झाले. तेव्हां आपण होऊन असल्या माणसावर जोखमीचें काम सांगूं नये अर्से मेथाजींना वाटून त्याचे पाठोपाठ तेही दुकानाकडे वळले.

 आनंदा जाऊन पोहोचण्याच्या अगोदर तुळशीराम तिकडे कशाला गेला होता कोण जाणे. पण तो दुकान उघडून मेथाजींच्या गादीवर बसून कांहीं तरी करतो आहे असे त्याला आढळून आले. आता काय करावे ? या विचारांत आनंदा मार्गे वळला, तो मेथाजी त्याचे दृष्टीस पडले. मेथा- जीस पाहातांच आनंदाला समाधान झाले. मेथाजी जवळ येतांच त्यानें अगर्दी हळूच दुकानांतील प्रकार सांगितला. मेथाजींनींही तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. तो तुळशीराम पेटींतून रुपये काढून खिशांत टाकतांना त्यांच्या दृष्टीस पडला. नंतर थोडा वेळ जाऊं दिल्यावर मेथाजी सहज गेल्यासारखे दुकानांत गेले. तुळशीराम दुकान व बैठक झाडण्याचे मिषानें केरसुणी इकडे तिकडे मारूं लागला. मेथाजींनी व आनंदानें पेटी उघडलेली पाहिल्याची ओळख तुळशी- रामास दिली नाहीं. पुढे त्या रुपयांची चौकशी होतेवेळीं हा काय म्हणतो हैं पाहाण्यासाठी ते दोघेही गप्प राहिले.

 त्या वेळीं मेथाजींची तुळशीरामावर सारखी नजर होती. तिन्हीसांचा मंड- ळीच्या गडबडीत तुळशीरामानें दुकानांतून आणलेले रुपये आनंदाचा कोट खुंटीवर होता त्याच्या खिशांत हळूच टाकले. मेथाजींनी झालेला सर्व प्रकार शेटजींच्या कानावर घातला. दुसरे दिवशीं सकाळ शेटजी आनंदास व तुळशी- रामास बोलावून पेढीवरचे रुपये गेले कसे, हे विचारूं लागले. तुळशीरामानें, “मला नाहीं ठाऊक - मला नाहीं ठाऊक ! मीं बाळपणापासून येथे वाढलेला. आपल्याला माझें वर्तन ठाऊक आहेच. आजपर्यंत कधीं सुपारीचें खांड उचलून घेण्याचेंदेखील माझे मनांत आले नाहीं.आपण नवीं नवीं माणसें घरांत आणतां व त्यांच्यामुळे आम्ही जुन्या लोकांना खाली पाहावें लागतें. तुम्ही पाहिजे तर माझा झाडा घ्या ” यासारखे तुळशीराम बराच बडबडत सुटला. त्याच्या मनांत आनंदाचें नांव पटकन् घ्यावयाचें शेंकडों वेळां आलें, व त्या अर्थाने