पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

३१

माधवप्रसादाला व त्याच्या आईला आपल्यापाशी नेलें. मर्जी त्याची असें म्हणून गयादीन दिसण्यांत एवढा गंभीर, पण तो खळखळ रडूं लागला. त्यानें आपल्याकडून रडें दावण्याची पराकष्ठा केली, पण तें म्हणून कांहीं केल्या थांबेना. त्याने आपल्या धोतरानें कांहीं वेळ तोंड झांकून घेतले. कांहीं केल्या त्याचें रडूं त्याला आवरेना. त्याची तो दुःखाची उसळी गेल्यावर मथुरादास शेटजींनीं आनंदास आपल्या पेटीवर चाकरीस ठेवण्याचं कबूल केलें.

 शेटजींच्या घरी आनंदा चाकरीस राहिल्यावर त्याच्या रूपांत पुष्कळ फरक पडला. तो अगदी काळाकुट्ट शिद्दयासारखा दिसत असे, तो आतां चांगला उजळत चालला. त्याचे डोळे मूळचेच पाणीदार होते, नाक सरळ होते. आता त्याच्या गालांवर मांस येऊं लागल्याने त्याचा चेहरा जास्तीच चांगला दिसत चालला. त्याचा बधाही चांगला मजबूत होता.

 आनंदा शेटजींच्या घरीं व पेढीवर प्रत्येक माणसाचे काम मोठ्या आस्थेनें व काळजीने करी. त्यामुळे त्यांची व त्यांच्या एथल्या एकूणएक माणसांची त्याच्या- वर मर्जी बसली. मथुरादासांचा एक लहान चारपांच वर्षांचा मुलगा होता. त्याला आनंदाशिवाय एक पळभरही चैन पडत नसे. रात्रीं झोंपेंतून उठला तरी देखील तो आनंदाला हाक मारी, व आनंदाही जम्नादासाला ( मुलाचे नाव ) मनापासून खेळवी.

 शेटजींची बायको साखरवाई इचे तर पोटच्या मुलाप्रमाणे त्याजवर प्रेम बसले. -सर्वोच्याकडून चांगले म्हणवून घेतलेले कपटी अंतःकरणास खपत नाहीं, व प्रत्येक चांगल्या मार्गे एखादें वाईट असतेच. त्यांतून आपल्या अंगी चांगला गुण नसला तर दुसऱ्याचा चांगला गुण कोठून सहन होणार ? असा मनुष्य- स्वभावच आहे. त्याप्रमाणेच आनंदाचा विनाकारण मनांतल्या मनांत द्वेष कर- णारा माणूस आनंदाच्या दुर्दैवानें शेटजींच्या घरांतच भेटला.

 एकंदर सगळ्यांचेकडून आनंदा चांगले म्हणवून घेऊं लागला; मुख् शेट, शेटाणीण व छोटेशेट यांना तर तो फारच आवडता झाला. हे तेथें अस लेल्या एका त्याच्याच बरोबरच्या चाकराला खपत नसे. मनांतून तो आनंदाचा भारी द्वेष करी व मनांतल्या मनांत जळफळे. प्रत्यक्ष आनंदाश बाह्यात्कारी त्याचे वर्तन फारच प्रेमाचें असे. त्यामुळे विचारा आनंदाही त्याच्याशी सरळ-