पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
चांदण्यांतील गप्पा

 आनंदाची हकीकत ऐकून शेटजींनाही फार दया आली. त्यांनी आनंदास तीच पुडी बक्षिस देऊन आणखी दोन रुपये बक्षिस दिले, व संध्याकाळी मी मारुतीला येईन तेव्हां गयादिनासह तूं मला तेथें भेट, असे त्यास सांगितले.

घरी गेल्यावर त्यानें सर्व हकीकत गयादिनास सांगितली व ते रुपये त्या- जवळ दिले. तेव्हां गयादिन म्हणाला:- 'बेटा, परमेश्वर चांगल्यावाईटाचें फळ देतो म्हणून मी जें म्हटके होते त्याचे हे घे प्रत्यंतर. तूं आतां चांगल्या रीतीनें बागलास म्हणून तुला त्याने चांगले बक्षिस दिले. आणि तसाच देवापुढचा नारळ, खारका खातास तर कदाचित् देव तुला चाबकाचे बक्षिस देता.'

 संध्याकाळी देवळाच्या पडवीत गयादीन व आनंदा शेटजींच्या गाडीची वाट पाहात बसले. ठरलेल्या वेळी शेटजींची गाडी देवळाजवळ आली. आनंदानें आपल्या कालच्या मित्राच्या पाठीवर थाप मारून लगाम घरला. शेट गाडीखालीं उतरले. गयादिनानें लवून आदबीने मुजरा केला. त्यांनी विचारल्यावरून त्यानें आनंदाची सर्व हकीकत सांगितली.

 गयादीन म्हणाला:– 'महाराज, परमेश्वराचे दयेनें व तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने आनंदाला आजपर्यंत कसाबसा मी वाढविला. पण आतां माझें म्हातारपण झाले. माझी या लोकची यात्रा संपत संपत येऊन मी अगदर्दी शेवटीं परलोकाच्या पायरीशी येऊन ठेपलों आहे. केव्हां पुढे पाय टाकीन याचा काय नेम ? तेव्हा आपल्यासारख्यांचा जर त्या गरीवाला आश्रय मिळेल, तर चांगले होईल, प्राण्यास प्रेम करण्यास कोणी तरी लागतें. अमका एक आपल्यावर प्रेम करितो. एवढघानेंच माणसास किती तरी आधार वाटतो, त्याचे मनाला धीर येतो व एवढचा थोरल्या अफाट जगांत आपले असे म्हणण्यास कोणी तरी आहे, असें त्यास वाटतें. पण माझ्या मागे या ईश्वराच्या प्राण्यास कोणी नाहीं. तो माझ्या जातीचा नाहीं. पण भगवानाने आम्हां दोघांची स्थिति सारखी करून असा हा विलक्षण रीतीने आमचा योग घडवून आणला. महाराज ! माझाही याच्याच एवढा अस्साच मुलगा भगवानाकडे गेला. त्याच्या पाठोपाठ त्याची आईही त्याला भेटण्यास गेली. याचप्रमाणे या पोराची आईबापें दोघेही गेलीं. त्यास नाहीं आईबाप, व मला नाहीं बायको पोर. तेव्हां जणूं काय या पोराचें संगोपन करण्यास देवानें मजसारख्यास येथें ठेविलें व माझ्या लाडक्या एकुलत्या एका