पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

२९

घोडा पुन्हा बुजेल म्हणून त्यांनी आनंदास घोडा धरून उभा राहाण्यास सांगि तलें व आपण देवदर्शनास निघून गेले.

 थोड्या वेळांत घोडेवालाही लंगडत लंगडत आला. त्याला काही फारसें लागले नव्हते. पण गुडघ्यास खरचटले होते व पाय मुरगळला होता. थोडक्यात चुकलें, नाहीं तर बिचारा ठारच मरावयाचा.

 देवदर्शन घेऊन शेट मथुरादास गाडींत बसले. घोडेवाला मांगें चढला. आनंदानें घोड्याचा कायदा चढवला व शेटजींना रामराम करून तो जाण्यास निघाला. शेटजींनी खिशांत हात घातला, व जें हातांत आलें तें घाईघाईन त्याच्या हातावर टाकले व त्यांची गाडी भरधांव चालू झाली.

 शेटजींनीं काय दिले म्हणून आनंदाने पाहिले तो ते चार रुपये होते. त्याला असे वाटले की, दोन आण्याचे पैसे देण्याच्या इराद्यानें त्यांनी गडबडर्डीत चुकून आपल्याला हे चार रुपये दिले. त्यानें तं रुपये तसेच खिशांत पुढी करून ठेविले.

 दुसऱ्या दिवशी सकाळीं नित्यकृत्य आटोपून आनंदा शेट मथुरादास यांच्या बंगल्यावर गेला. तो शेट पुढच्या ओटीवरच खुर्ची टाकून हुक्का पीत बसले होते. आनंदाला पाहातोच त्यांच्या मनांत आले कीं, हा आणखी काहीं मागण्याकरितां आला आहे.

 आनंदानें आगगांतूनच शेटजींना रामराम केला, व वर चढून त्यानें आपल्या खिशातील पुढी त्यांचे हातावर टाकिली, व तो मोठया नम्रपणाने म्हणाला शेट साहेब, काल आपण गडबडीनें चार ढब्बूंच्या ऐवजी हे चार रुपये चुकून मला दिलेत. ते हे मी परत आणले आहेत. महाराज, माझी कालची चाकरी आणा दोन आण्यापेक्षा जास्त झाली नाहीं. आपण जाण्याच्या गडबडींत चुकून दिलेले हे रुपये ठेवावे.'

 हे आनंदाचें सरळ व प्रामाणिकपणाचें वर्तन पाहून शेटजींना फार आश्चर्य वाटले. शेटजींना प्रामाणिक माणसाची किंमत फार वाटे. मग तो भिकारी असो कीं कुबेर असो. त्यांनी आनंदास खालीं बसावयास सांगून त्याची सर्व हकीकत विचारून घेतली. आनंदानेही ती सर्व सांगितली व तो शेवटीं म्हणालाः— 'मी एक वेळ फार द्वाड मुलगा होतो; परंतु मजवर हे सर्व गया दिनवावाचे उपकार आहेत. ' असे म्हणतांना आनंदाच्या डोळ्यांत आसवें उभी राहिली.