पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
चांदण्यांतील गप्पा

सरांपुढे हात पसरणे व तोंड वेगाडणे, वगैरे सर्व गोष्टी त्याने सोडून दिल्या. आता फक्त शाळेत जातांयती मात्र तो त्या सडकेवर येई व देवाचें दर्शन घेई. त्याच्यासारखी उनाड पोरें त्याला खेळावयाला हांक मारीत, पण आनंदा तिकडे जाईनासा झाला. असो. गयादीन त्याला तास दोनतास घरी देखील शिकवी. दोन वेळां शाळा, बाकी शिकणे, यांत सारा वेळ जाऊं लागल्याने त्याला वाईट मुलांच्याकडे बघण्याससुद्धां होत नसे. मग त्यांच्याशीं खेळणे कुठलें ?

 आनंदा बुद्धीनें चलाख असल्यामुळे शाळेतले घडे भराभर व चांगले करी. त्यामुळे शाळेत त्याचा नंबर नेहमीं पहिला असे. घरीं गयादिन रात्रीं व पहांटे त्याला नीतीच्या, सदाचरणाच्या, परोपकाराच्या व दातृत्वाच्या गोष्टी सांगे. यामुळे तो मुलगा फारच चांगला झाला.

 एक दिवस शनिवारची दुपारची शाळेला सुट्टी होती. गयादिनाबरोबर आनंदा देवाला भाला होता. तो घटकाभर देवळाजवळच्या पुलाच्या वरखंडी- वर वनशोभा व येणाराजाणारांची धांदल पाहात बसला होता. त्यांत आणखी त्या दिवशीं हनुमान् जयन्ती होती. त्यामुळे देवदर्शनास लोकांची दाटी झाली होती. आसपासच्या खेड्यांतले लोक एकसारखे दर्शनास येत होते. सडकेवर गाडयांची अगदी खेचाखेच झाली होती. जवळच्या एका गांवांतील मथुरादास या नावाचा एक श्रीमान् गृहस्थ त्या दिवशीं देवदर्शनाकरितां आपल्या गाडींत बसून येत असतां, त्याचा घोडा एका बैलगाडीच्या बुरख्याला पाहून बुजला व मस्ती करूं लागला. बिचारा घोडेवालातर खाली आलाच, घोडयाचे बागदोर ओढतो ओढर्ता मथुरादासाचे हाताचीं साली निघालीं, व लगाम लागून लागून घोड्याचें तोंड रक्तबंबाळ झाले, तरी त्याची मस्ती म्हणून थांबेना. हे आनंदानें दुरून पाहिलें व तो मथुरादासाच्याया साह्याला तीरासारखा धांवला. घोडा मार्गे मागे सरकत सडकेच्या खाली गाडी घालणार होता, त्याला आनंदानें लगाम खेचून पुढे भोढला. त्याचे मानेवर थाप मारून त्याचे कानविन पिरगळून स्याला शांत केला. गाडी उभी राहातांच शेट मथुरादास यांनी गाडीखालीं -उडी टाकिली. त्यांनी आपले घोडेवाल्याची चौकशी केली, तों तो मागून लंग- डत लंगढत येतांना दिसला. मग त्यांचा जीव थोडा स्वस्थ झाला. देवळाजवळ गाड्यांची व माणसांची एकच गर्दी झाली होती. अशा गर्दीत गाडी नेली तर