पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

२७

 गयादीन हा पलटणीत नोकरी करून पेन्शन घेऊन सुखवस्तु राहिलेला होता. त्याला बारा रुपये पेन्शन होते. त्याला एक मुलगा अगदी आनंदाएवढाच होता. त्याची बायको, मुलगा व तो तिघेही पूर्वी मोठया सुखांत होती. परंतु दैवाला त्यांचा आनंद खपला नाहीं. दैव कोणाचा हेवा करीत नाहीं ? विचा न्याचा एकुलता एक मुलगा विषमासारख्या भयंकर तापाला बळी पडला. त्याची आई ( गयादिनाची बायको ) मुलाच्या पाठोपाठ सहाच दिवसांनी आपल्या मुलास भेटावयास गेली ! विचाया गयादिनाची त्या दोघांतून एकालाही करुणा आली नाहीं. तिला अपत्यवियोग दुःसह होऊन, जन्माचा सोबती म्हणून म्हटलेल्या आपल्या पतीला सोडून तो आपल्या प्रिय पुत्राच्या भेटीस गेली. झालें. येऊन जाऊन कुटुंबाचीं तीन माणसें. त्यांत दोहोंची ही वाट; विचारा एकटा प्राणी राहिला. ! मुलगा व बायको मेल्यावर तो अगदी विदेही झाला. रात्रंदिवस परमेश्वर चिंतनांत तो आपला काळ घालवी. गयादिनाचा मुलगा माधवप्रसाद अगदों आनंदासारखा दिसे व वयानें त्याचेच एवढा होता. गयादिन जेव्हां जेव्हां मारुतीचे दर्शनास येई, तेव्हां तेव्हां आनंदा त्याचे दृष्टीस पडला की, त्याच्या पोटांत भडभडून येई व डोळे पाण्याने भरून येत. अर्से जरी होई तरी त्याला आनंदाकडे पाहावेंसेंच वाटे, व एखादेवेळी देव- दर्शनास आल्यावेळी जरा आनंदा तेथे आसपास नसला तर त्याला बरें वाटत नसे. आनंदाला आईबाप कोणी नसून अन्नान्नगत होऊन तो रस्तोरस्ती हिंडे, हे पाहून गयादिनास फार वाईट वाटे. आजपर्यंत शेंकडों वेळा त्याला आश्रय द्यावा असे. त्याच्या मनांत येऊन गेले, पण तसा योग आला नाहीं. तो आज सहजगत्या घडून आला.

 आनंदा गया दिनाचे घरी राहूं लागतांच त्याच्यामध्ये किती तरी बदल झाला ! जो आनंदा एक खूप मोठा फाटका व मळका कोट घालून हिंडे, तोच आनंदा आतां चांगले धुवट व आंगानेटके कपडे घालूं लागला. त्याला नेसा- वयास धोतरे मिळू लागलीं, त्याच्या डोकीस टोपीचा कधीं स्पर्श नव्हता ती आती चांगली टोपी आली व पायांस जोडा मिळाला. गयादिनाने आनंदास जवळच्या गांवीं शाळेत घातले. त्यामुळे देवासमोरच्या सडकेवर धुळींत कवड्या खेळणे, सडकेवरून जाणाऱ्या तांग्यांच्या मार्गे धांवत सुटणें, आल्यागेल्या वाट-