पान:चांदण्यातील गप्पा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

२५

मी तुला कांहीं मारहाण करीत नाहीं; पण त्या लोकांच्या जिनसा तूं चोरल्यास, हे फार वाईट केलेस. तुला आईबाप नाहींत. वेळच्या वेळीं- किंवा केव्हांही- तुला तुझ्या घरीं कांहीं खाण्यास नाहीं हे मला ठाऊक आहे. तरी तूं अशा रीतीनें कोणाची वस्तु चोरून घ्यावी हे फार वाईट आहे. तुझ्या खिशांत काय आहे तें पाहूं तर दे.

 गयादिनाचे बोलण्याचा स्वर, त्याची प्रेमभरित पण थोडी-निग्रही मुद्रा, वगैरे पाहून आनंदाच्यानें नाहीं म्हणवलें नाहीं. त्यानें त्या जिनसा खिशांतून काढिल्या व गया दियापुढे ठेविल्या. त्याला आतां मेल्यापेक्षाही मेल्यासारखे झाले. त्यानें केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला पुरा पश्चाताप झाला. आतां हा म्हातारा कांहीं न बोलेल तर वरें, आपली आतां याचे हातून कशी सुटका होते, असें त्यास वाटलें.

 गयादिनाने त्याला पुष्कळ उलटसुलट प्रश्न केले. त्यामुळे तर तें पोर फारच भ्यालें.

गयादीन–बेटा, या जिन्सा मारुतीपुढे होत्या कीं नाहीं ?

आनंदा - ( डोळे चोळीत चोळीत ) होय.
गयादीन- मग त्या कोण घेतो ? त्यावर कोणाचा हक्क ? तुझा की गुरवाचा ?

आनंदा--गुरवाचा.


 गयादीन -- मग त्या तूं कां घेतल्यास ? है यांत पैसेही आहेत. तूं ही चोरी केलीस. तूं जेव्हां या जिनसा घेतल्यास तेव्हां तुला वाटले असेल कीं, या उचल- तांना तुला कोणी पाहिले नसेल. पण बेटा, परमेश्वर सर्वोची एकुण एक कृत्यें बघतो. तो चांगल्यावाईटावर नजर ठेवून त्या त्याप्रमाणे फळ देतो. तुजसारख्या लहान परक्या पोरानें असा अन्याय करावा हे त्याला खपलें नाहीं. तुला चार समजुतीच्या गोष्टी सांगून वाटेवर आणण्यास देवानें मला आज्ञा दिली आहे. तूं अशाच लहान लहान चो-यामान्य करता करतां पुढे मोठा दरवडेखोर असतास व कित्येक बिचाऱ्या महात्म्यांचे शिव्याशाप घेतास. कित्येक लोकांना त्यांच्या श्रमाचा पैसा चोरून अन्नान्न करावयाला लावतास. शेवटीं कधीं ना कधीं सरकारचे शिपायांच्या हातीं सांपडतास, व ते तुझे हाल हाल करून तुजकडून तुझे गुन्हे कबूल करवून न्यायाधिशापुढे