पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुतीचा प्रसाद

२१

होऊं लागला, व त्याबरोबर पैशाचाही फन्ना उडूं लागला. केरोबा तर दररोज -संध्याकाळी घरी येतांना, कलालाच्या दुकानांत सोबत्यांसह गेल्याशिवाय आले असें कर्धीच झालेच नाहीं. अशा रीतीनें दोघांचे दिवस चाललेले असतां विठा- -बाईस एक मुलगा झाला. त्याचें नांव आनंदा ठेविले. आईबाप व्यसनी, व केरो- • बास आतां पैसा देखील मिळेनासा झाला. मग मुलाची कोण काळजी घेणार ? • मुलगा चार पाच वर्षांपासून रस्त्यांतल्या मुलांत खेळे. त्याच्या अंगावर घड स्वच्छ कपडासुद्धा नसे. बापाचें व्यसन व आईचें व्यसन परमावधीस पोहोंचलेलें, तेव्हां मुलाने तरी दुसरे काय करावे ? केरोवाला आतां कामधंदा कांहींच मिळत नसे. कारण त्याला काम देऊन ते हा करीलच असा काही नियम नसे; म्हणून लोक त्याला कामच देईनातसे झाले. दोघेही व्यसनाधीन व ऐदी असल्यानें -दारूस व खाण्यापिण्यास पैसे कोठून मिळणार ? मग एकमेकांवर कातावणे, शिवीगाळ, भांडाभांडी, व वेळीं मारामारी सुरू झाली; व या सगळ्याचा परिणाम रडण्यांत होऊं लागला. रोज शेजान्यापाजान्यांनी येऊन यांचीं भांडणें •तोडावी, असा नित्याचा क्रम चाललेला असे. घरांत जे ज्याच्या हातीं सांपडेल तें “त्यानें घ्यावें, विकावे व त्याची दारू घेऊन प्यावी. अज्ञानें घरांत काय राहाणार ? जी विठाबाई अक्षयीं खाटेवर नटून बसावयाची तिला आतां पुरतें घोंगडीचें पट्टेही बसावयास मिळेनासे झाले. जी सदोदित सजलेली बसावयाची तिच्या गळ्यांत एक सोन्याचा मणीही मिळण्याची मारामार पडली. नेसल्या लुगड्यास दोन तीन प्रकारचे तुकडे जोडलेले दिसत, व चोळीच्या ठिगळांची तर संख्याच नसे. अन्न असले तर अपलें, नसले तर नसले. दारू मिळाली कीं झालें. शेजारपाजा- रच्या बायाबापड्यांना भुलथापा देऊन, गोड बोलून, आर्जव करून, तुमचीं कार्मे करतें म्हणून ती पैसे मिळवी. एखादे वेळ शेजारी बायना दया आली तर त्यांनी एवढे तेवढे यावें. मुलगा आनंदराव तर फाटकींतुटक चिरगुटै अंगावर घालून अक्षयीं सडकेवर हिंडे, व येणाऱ्या जाणान्यांजवळ हात पसरून मिळेल तें खाई. याप्रमाणे त्या केरोबाच्या कुटुंबाची स्थिति अत्यन्त हृदयद्रावक होऊन गेली !

 केरोबानें व विठाबाईनें सुधाररावें म्हणून त्यांच्या शेजाऱ्याापाजायांनी आपलेकडून पराकाष्ठा केली, पण त्या दोघांच्या व्यसनांत किंचित् देखील बदल होईना. शेवटीं त्यांतच ती मेलीं. मनुष्यांनी गजबजलेल्या एवढया अफाट जगांत