पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
चांदण्यांतील गप्पा

 अंगणांत आल्यावर ते म्हणाले " काय बोवा, तुम्ही गोष्ट सांगायला सांगतां मला ? मी रेव्हेन्यूमधला माणूस. बारनिशी करितां करितां हे पाहा मनगटाच्या सांध्याचे हाड देखील निखळले ! मला आपले पंधरा एके पंधरा ठाऊक ! मला गोष्टी कोठून येणार ? आतां तुम्ही सांगाच म्हणतो, तर या इथे सागांवच्या मारुतीच्या देवळांत कांही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट परवां मला एकानें सांगितली ती सांगतों. तिच्यापासून मोठ्यांनीं व विशेषतः लहान मुलांनीं व त्यांच्या आई- बापांनी उपदेश घेण्यासारखा आहे."

 ते गृहस्थ म्हणाले:- “कार्ले खिंडींतून येतांना खालची लहान गाव मोठी मजे-- दार दिसतात. ती लहान लहान केवळाचीं छपरें, जवळ जवळ वसलेले गांव, वरून फारच नामी दिसतात. बांध घालून केलेली चौकोनी, तिकोनी, अष्टकोनी, षट्कोनी अशी ती सुंदर कुंडाच्या रूपाची शेतें, त्यांच्या बाजूला तीं लहान मोठीं झाडे व पेंढ्याची उडवी यांची शोभा दिसते. खिंडीच्या पायथ्याशी अशी तीन चार गवि आहेत. त्यांतील तळवडा या गांवांत केरोबा नावाचा एक पाचकळशी राहात होता. तो सुतार कामांत फारच वाकबगार व चतुर होता. अलिबाग, पेण, पनवेल, नागोठणे वगैरे ठिकाणी त्याच्या कारागिरीच्या कामाची ख्याति होती.

 भव्य वाडे व सुंदर देवळें, सोईस्कर व टुमदार बंगले वगैरे कोणास बांधाव-- याचे झाले तर त्यांत केरोबा हा कामगार असावयाचाच. चेऊल, रेवदंडया- पासून नागोठणे वगैरे ठिकाणाच्या नामांकित इमारती त्याच्या हातच्या चातु-- र्याची साक्ष देत आहेत. त्याला पैसा अतोनात मिळे. नवरा अतिशय पैसा मिळविता असल्यावर बायको कशाला कामधंद्याला हात लावील ? ती घरांत आहे नाहीं पाहात देखील नसे. अक्षयीं खाटेवर बसून असावयाची. घरात गड्यांनीं वगैरे कामे करावयाचीं. केरोबा कामावरून आल्यावर दोघांनी जेवायाचें व गप्पा सप्पा मारून वेळ घालवावयाचा. केरोवा कामावर गेल्यावर त्याची बायको विठा- बाई आपल्या शेजारपाजारच्या वायका जमवून इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत वसावयाची. त्यांत एक दोघी वाईट बाया होत्या, त्यांच्या संगतीनें तिला दारू- पिण्याचें व्यसन लागले. त्यामुळे मृत्युलोकीं राहून स्वर्ग कसा आहे तो पाहावयाची तिला चटक लागली ! स्वतः घेतां घेता, आयावाया आल्यावर पाहुणचाराकरितांही तिचा उपयोग होऊं लागला. मग एक रोज डझन अर्धा डझन बाटल्यांचा खप