पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मारुताचा प्रसाद

१९

सारखे परोपकारी दुनियेत कोणी नसतील. परोपकार करावयाचा, याशिवाय त्यांना दुसरी गोष्ट माहीत नाहीं. ऊन असो, पाऊस असो, सोसाटयाचा वारा सुटलेला असो. सर्व प्रसंगी वृक्ष तटस्थ वृत्तीने आपल्या आश्रयास राहिलेल्या पक्षिगणाचे रक्षण करितात. एवढेंच नाहीं, तर आम्ही माणसांनों कुन्हाड घेऊन त्यांचे बुधांवर घातली व त्यांस समूळ खणून काढण्याचा विचार केला, तरी ते या कुन्हाड घालणारास उन्हाची बाधा होऊं नये म्हणून त्याजवरही छायाच करितात. असे अत्यंत परोपकारी वृक्ष आतां सांवलीच्या रूपाने आपली जागा सोडून पलीकडे शेतांत आट्यापाटया खेळण्यास गेले आहेत. त्यांची पानें वायनें हालत आहेत. त्यामुळे ते जणूं काय हस्तसंकेतानें एकमेकांस बोलावीत आहेत. आमच्या झोंपडीच्या भोंवतालचे म्हातारे म्हातारे आम्रवृक्षसुद्धां सांवलीच्या -रूपानें पलीकडच्या शेतवाडींत खेळण्यास गेले आहेत असे भासे व प्रत्यक्ष आमच्या झोंपड्यादेखील तो खेळ बघावयास जाण्याचा यत्न करीत आहेत असें दिसे.

 हे पाहा सभोवतालचे डोंगर एखाद्या प्रचंड भुईकोट किल्ल्याच्या तटासारखे दिसत आहेत. अथवा सृष्टीने आम्हां वनवासी लोकांचे रक्षण करण्यास्तव जणूं काय हे जागले निर्माण केले आहेत, व ते उभे राहून कंटाळले म्हणून घोंगड्या 'पांघरून एकमेकाला चिकटून बसले आहेत! त्यांतील कांहीं जणांनी झोंप टाळण्या. करितां रानांत पेटलेले राव व डोंगरांवरील वणवे त्याच जशा चिलमा त्या पेटवून ते ओढीत वसले आहेत ! चंद्रकोर फारच खाली गेल्यामुळे आकाश-कृष्णवर्ण किन- -खाबी छतासारखें सुंदर दिसत आहे. जिकडे तिकडे शांत व गंभीर झाले आहे. वृक्षांवरून क्वचित् फडफड असा शब्द ऐकूं येत आहे. जवळपास बोल- णाच्या माणसांच्या शब्दांचा कुठें भास होत आहे. या निवांत वेळी फक्त जागल करणारी कुत्रीं व रात्रीं संचरणारी कोल्हीं यांच्या शब्दांनी मात्र खूप गोंगाट करून सोडला आहे.

 अशा वेळी आमचे त्या रात्रींचे गोष्ट सांगणारे गृहस्थ घोंडोपंत जेवणखाण आटपून, खाद्यावर एक खादीचे फडके, अंगांत कांहीं नाहीं, नेसलेल्या पंचाचे सोगे मोकळे सोडलेले, हातांत चंची, तिची नाडी भुईवर लोळतेच आहे, व सुपा- बीचे खांड चघळीत व अंमळ हास्य करीत असे आपल्या झोपडींतून बाहेर पडले.