पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोष्ट दुसरी.
"मारुतीचा प्रसाद.'


आम्ही सर्वजण आज आमच्या अंगणांत लवकर जमा होऊन गोष्ट केव्हां सुरू होते म्हणून वाट पाहात बसलों होतों. आज गोष्ट सांगण्याची पाळी एका पोत गृहस्थावर आली होती. त्यांनीं बऱ्याच वेळां गोष्ट सांगण्याचें कबूल केले होतें, पण सांगण्याची वेळ आली कीं, ती कांहीं तरी निमित्ताने ते टाळीत. आज अगदी त्यांचा पिच्छा पुरवावयाचा असा आम्हीं निश्चय केला व त्याप्रमाणें जेवणखाण लवकर आटपून अंगणांतल्या खाटांवर येऊन बसलो.

 शुद्ध षष्ठि असल्यामुळे च/दणें वेताचेच होतें. चंद्रकोर पश्चिमेकडे वळली होती, चंद्राबरोबरच एक देदीप्यमान् चांदणीही अगदीं चंद्रासरशीं चालली होती. जणूं काय चंद्र व रोहिणी एकमेकांचा हात धरून आपल्या निवासस्थानी चालली आहेत ! किंवा उभयतां समुद्रस्नानास निघालीं असतां, रोहिणी आपल्या स्त्रीस्वभावास अनुसरून ' मला बाई भय वाटतें. मी नाहीं पाण्यांत पाय ठेवायची ! आपल्याला आपलं जायचंच तर जा करा स्नान 1-2 असे म्हणत मार्गे सरकत आहे, व ते पाहून चंद्र जसा कांहीं तिचा हात धरून तिला ओढीत ओढीत अग वेडे ! माझ्यासारखा पोहणारा तुजबरोबर असतां तूं कां इतकी भितेस ? चल, आपण स्नान करूं !' असे म्हणून पाण्यात बुडी मारण्यास प्रवृत्त झाला आहे ! वारा मंद मंद वाहत होता. पूर्वेकडून नक्षत्रगण झपाटयानें नभोगणांत येत होता. जणूं काय चंद्ररोहिणी, जोडधानें, एकमेकांचा हात धरून समुद्रात उतरत आहेत ते कौतुक पाहाण्यास ही सर्व मंडळी लगबगीनें व घाईघाईनें जमली आहे !

 चंद्र पश्चिमेकडे बराच खाली गेल्यामुळे झाडांच्या सांवल्या लांब लांब पडल्या होत्या व वान्यानें तो झाडे थोडथोडीं द्दालत होतीं. जणूं काय सर्व दिवसभर परोपकाराचे काम करून ती थकलीं भागली आहेत असे दिसे. बिचान्या वृक्षां-