पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

१७

 असो. याप्रमाणे त्यांनी आपली हकीकत सांगून, माझ्या शंकेचें व कुकल्पनांचें निरसन केले. त्यांनी माझ्या चांगल्या वर्तनाबद्दल मला ५०० रुपये बक्षीस दिलें व राहिलेल्या दिवसांचा पगार देऊन, शिवाय मला काही कायद्याची पुस्तकेंही पाहिजे होतीं तीं देऊन, त्यांनी माझा निरोप घेतला. सरदेसायांची गढी सोडताना माझ्या बायकोला, मला व त्यांच्या मुलांना फार वाईट वाटले. परंतु इलाज काय ?

 मी त्याच वर्षी वकिलीच्या परीक्षेत पास झालों, व बाबासाहेबांच्या आशि- र्वादानें सुखांत आहे. माझा वंदाही चांगला चालतो. असो. मी गढी सोडल्यावर कांही दिवसांनी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेले बाचले की, बाबासाहेब सर देसाई घोड्यावर बसून फेरफटका करावयास गेले असता घोडा उधळून ते खालीं पडले व त्यामुळे त्यांचा अंत झाला !