पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
चांदण्यांतील गप्पा

नाहीं. माझ्या प्रियेला क्षयाने पछाडले. तिला अनेक वैद्य व डॉक्टर यांजकडून औषधें देवविलीं. पण तिच्या दुखण्याचे पाऊल मार्गे म्हणून हटले नाहीं. ती मरणाला भीत नव्हती. तिनें मुलांचे कसे होईल म्हणून कधीं काळजी केली नाहीं. आपले मन संसारांत गुंतविलें नाहीं - पण तिला रात्रंदिवस माझी काळजी लागली होती. तिला वाटे, आपण मेल्यावर मी पुन्हा त्या भयंकर व्यसनराक्षसाच्या दाढेत सांपडेन. याच गोष्टीची ती काळजी करी. तिची अशी अवस्था असतो मला नाइलाजामुळे कामासंबंधानें इंदुरास जाणें भाग पडलें. मी गेल्यावर दोन तीन दिवसांनी तिची प्रकृति जास्त विघडून, माझ्या आनंदरूप उपवनांतील आवडती मधुमालतीची कळी दुष्ट काळानें चोरून नेली ! माझ्या सुखातिशयरूप धनाच्या पेटीवर दरवडा पडला. माझ्या सुखाचा झरा आटला ! — व मी दोन माशाप्रमाणे रखरखीत मैदानावर पडलों असे मला वाटले. घरी आल्यावर मला सर्व कळले. मी अतिशय शोक केला. मला माझे आईबाप, आप्त, इष्टमित्र या सर्वोचा त्याच वेळीं अंत झाला अर्से वाटले पाहिजे तितका शोक केला, तरी मला या वेळीं समजुतीच्या गोष्टी सांगावयाला कोण येणार ? हीं दोन मुलेहो मजप्रमाणे आतां दीन झाली, असे मनांत येऊल मला दुःखाचें आणखी भरतें येई. असो. कांहीं वेळाने मी आपला शोक आवरला, आणि माझ्या प्रियने मला काहीं निरोप कागदावर लिहून ठेवला आहे काय, म्हणून शोधूं लागलों तो कारमान्याने एक कागदांत गुंडाळलेली किल्ली आणून दिली. ती त्याला तिचे अंथरुणांत सापडली होती. मी तो कागद उलगडला. त्यावर तिने आपल्या हातानें हीं अक्षरें लिहून ठेवली होतीं:— 'जें काय आहे ते शिसवी पेटींत आहे.' ती पेटी उघडून पाहिली तो द्दा फोनो-- ग्राफ मला दिसला. किल्ली फिरविल्यावर तिनें आपले शब्द त्यांत ठेविलेले जसेच्या तसेच ऐकूं आले. तेच तुम्ही मघाशीं ऐकलेत- व एकादशींच्या रात्रींही तेच ऐकलेत." बाबासाहेबांनी भिंतीला टांगलेल्या दोन तसविरींकडे बोट करून सांगितलें - ' हे माझे गुरु: ' व पेटीकडे वोट करून म्हणाले - त्या दोघांपैकी एकाचा हा उपदेश. ' तसविरीकडे पाहिले तो त्यांत एक स्त्रीची असून ती मोठी सौम्य, सुंदर स्त्री असावी अशी माझी खात्री झाली.

 बाबासाहेब म्हणाले:-‘मी नित्य दिवसांतून तीन वेळ माझ्या प्रियेचे गोड शब्द ऐकतों व सर्वदा तिचे प्रतिबिंवाच्या सान्निध्यांत वेळ घालवितों.'