पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

१५

मी आपल्या गुरूचा मात्र आज्ञाभंग कधीं केला नाहीं, व ते सांगतील ते करण्याची प्रवृत्ति माझ्या मनानें सोडली नव्हती.

 "मी एकदा बाहेरगांवी आपल्या गुरूकडे गेलों होतों. माझी सध्यांची स्थिति कर्णोपकर्णी त्यांच्याही कानावर गेली होती. मी नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन कोहीं वेळ तेथें बसून जाण्यास निघालो. तेव्हां त्यांनी मला आशिर्वाद देऊन सांगितलें कीं, ' गणपतराव, पुढच्या खेपेला याल ते असे विधुर येऊं नका. द्वितीय संबंध करून उभयतां या. ’ मी 'होय' म्हणून गुरुजींना वंदन करून निघालों. माझ्या गुरुजींचें नांव आनंदलहरी यति. ते फार विद्वान्, निस्पृह, कर्मठ, निश्चयी व निरिच्छ असे होते. मी परत मुंबईस आल्यावर गुरुजींची आज्ञा आपल्या स्नेह्यांना व कारभायाला कळविली. प्रथम त्यांना ती थट्टा वाटली. पण मी सांगतों हे अगदी खरे असल्याबद्दल त्यांची खातरी करून गुर्वाज्ञेप्रमाणे वागण्याचा मी माझा निश्चय हांना कळविला. माझी लग्न करण्याची खरोखर इच्छा पाहून माझे स्नेही व कारभारी मुली पाहू लागले.

 “मी असला अट्टल व्यसनी माणूस ! पण संपत्ति अतोनात असल्यामुळे आठ दहा दिवसांच्या आंतच मला चांगली मोठी, सुस्वरूप, गरिबाची पण कुलीन मुलगी मिळाली. पैसा असल्यावर मुली मिळावयाला कांही अडचण पडत नाहीं, असें जें म्हणतात तें माझ्यासंबंधाने तरी खरें झालें ! माझ्या सुदैवाने मला बायको चांगली मिळाली. तिची वागणूक भारदस्त होती, बोलणें गोड व खरें, स्वभाव शांत व सरळ असून, ती विचारी व आपला अधिकार संभाळून वागणारी अशी होती. ती माझे घरी आल्यावर तिचा आनंदी स्वभाव, नम्रपणा इत्यादि एकंदर गुणांमुळे माझें तिजवर अत्यंत प्रेम जडलें. मी तिचा अगदी दास वनलों. तिच्या आज्ञेबाहेर एक पाऊलसुद्धां टाकावयाचें नाहीं असा निश्चय केला ती मोठी संसाग्दक्षही होती. हळू हळू तिच्या उपदेशानें माझें व्यसन सुटत चाललें, व थोड्या दिवसांत ते पार नाहींसें झालें. हलकट लोकांची संगत सुटली. मी तिच्यासह मोठ्या आनंदाने संसार करूं लागलों व्यसनमुक्त झाल्यावर माझी प्राप्ति आणखी वाढली. तिच्यामूळे माझी लोकांत चांगली कीर्ति झाली. परमेश्वर- कृपेनें मला तिचेपासून हीं दोन अपत्यें झाली. त्यामुळे माझें संसारसुख आणखी दुणावले. याप्रमाणे मी आनंदसागरांत यथेच्छ डुंबत असतां तें दैवाला पाहावले