पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
चांदण्यांतील गप्पां

तो पुनः तसेच शब्द माझ्या कानीं आले. हे शब्द थोडे गाण्याच्या सुरांत भाल्या- -सारखा मला भास झाला.

 या वेळी मी अगदीं धैर्य केलें. उठून उभा राहिलों. मी ऐकला हा स्त्रीचाच शब्द काय, याची आपल्या मनाशीं खातरी करून घेतली, शेंडी बांधली, धोतराच्या -ओढळ्या घट्ट केल्या, सदस्याच्या गुंडया निघाल्या होत्या त्या घातल्या, व नीट बाबासाहेबांच्या खोलीत शिरलों. मला पाहातांच बाबासाहेब रागानें खुर्ची- वरून उठले व दाराशीं येऊन रागाच्या स्वरांत मला म्हणाले, -

बाबा०-कोण ! - पुरुषोत्तम ?
मी ( भीत भीत ) - होय, मीच तो.

 बाबा० - ( रागानें ) एवढया रात्रीं विचारल्यापुसल्य वांचून येथें कसे आलां ?
 मी हात जोडून मोठ्या नम्रपणाने आपली सर्व हकीकत त्यांना जी होती ती -खरी खरी सांगितली. मी बोलत असतां त्यांचा राग थोडथोडा कमी कमी होत गेला असे मला वाटले; व माझे बोलणे सर्व खरें व मी झालेली हकीकत इमान ने -सांगितली, अशी त्यांची खात्री झाली. ते म्हणाले- “गोष्ट झाली त्याला इलाज नाही. ज्याअर्थी तुम्हाला अवचित माझें गौप्य कळले आहे, त्याअर्थी मीच आतां ते सर्व सांगतो. पण उद्या सकाळला तुमची माझी गांठ पडूं नये व पुनः कधींद्दी तुमची माझी दृष्टादृष्ट होऊं नये, अशी माझी इच्छा आहे. " असे म्हणून त्यांनी आपली हकीकत सांगण्यास आरंभ केला.

बाबासाहेब सरदेसाई म्हणाले:-
 "माझी पहिली बायको वारल्यावर मी केवळ पिशाच्चवृत्ति धारण केली होती. त्या वेळी पैसा तर माझे घरांत गंगेच्या लोगप्रमाणे वाहात येत होता. त्यामुळे मी अगदीं धनधि होऊन कोणालाच मोजीनासा झालो. माझ्या नातेवाई- कांनीं दुसरे लग्न करण्याविषयों मला पुष्कळ आग्रह केला. पण मी कसला त्यांना जुमानतों ! मी त्यांना साफ सांगितले की, मला लग्न करावयाचें नाहीं. मी भल्यांची संगत सोडन हलकट तोंडपुजे लोकांना चाहूं लागलों. माझ्या घरात अक्षयी अशा लोकांच्या बैठकी होत असत. त्यांच्या नादानें मला दारूची वगैरे वाईट व्यसने लागली. मी दारू पितां पितां अट्टल दारूबाज वनलों. रात्रंदिवस त्यांतच गुंग होऊन पडूं लागलों. मला कोणाचीही पर्वा नाहींशी झाली. फक्त माझ्या सुदैवानें