पान:चांदण्यातील गप्पा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी.

१३

गार असेल म्हणून आजपर्यंत ती आल्याचें कोणाला कळले नसावें. काय असेल ते असो, कांहीं तरी गूढ आहे खरें. कदाचित् त्यांच्या खोलींतूनच तो चोरवाट असेल व म्हणूनच कोणी त्या खोलींत गेले असता त्यांना राग येतो व ते त्यावर अतिशय संतापतात. अशासारखे विचार पुनः पुनः माझ्या डोक्यांत घोळत राहिले. त्यामुळे अहोरात्र जागरण झाले. तशांत आणखी रात्रीं पोटांतही दुखूं लागलें. नुस्ती बिछान्यावर लोळून रात्र काढली. सकाळी तोंड धुणे वगैरे करून अंगरखापागोटे घातले, व गंगापुरीत माझ्या ओळखीचा एक वैद्य होता त्याचेकडे गेलों, व पोट दुखत होते त्यावर औषध मागितले. त्याने ते दिले. मी औषधाच्या पुडया घेऊन घरीं आलों व वैद्यबोवांनी सांगितल्याप्रमाणे त्या घेतल्या. त्या दिवशीं लवकरच जेवणखाण करून पुस्तकसंग्रहाच्या दालनांत अभ्यास करीत बसलों. मुलांना त्या दिवशीं आदितवारची सुटी होती. अभ्यास करीत असतां केव्हांच मला झोप लागली; हातांतले पुस्तक खालीं गळून पडले, व मी चांगला घोरूं लागलों असे वाटते.

 मी किती तासांनी जागा झालों ते मला काही कळले नाही. जागा झालों तेव्हां जिकडे तिकडे अंधार पडला होता. दिवे लावण्याच्या वेळी गड्यानें चोहोकडची दारें लावून बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. मी निजलेला, कदाचित् त्याला अंधारांत दिसलों नसेन. मी अशा रीतीने कोंडला गेलों. या दाराशी जा, त्याला धक्का देऊन पाहा, त्या दाराशी जा, त्याला धक्का देऊन खडखडाव असें मीं पुष्कळ केलें; पण सारी दारें लावली गेल्यामुळे माझा कांहीं इलाज चालेना. कोणाला मोठयानें हांक मारावी तर बाबासाहेबांची बसावयाची खोली अगदी जवळ ! अशा पंचाइतींत जो पडलों आहे, तो माझ्या कानावर असे शब्द पडले ! 'ऐकले का ? आपण एवढे वाईट वाटू देऊं नका. मी कांहीं लांब नाहीं. जेव्हा म्हणाल तेव्हां आपल्याजवळच आहे" हे शब्द कार्नी पडतांच माझी छाती धडधडूं लागलो, अंगावर कांटा उभा राहिला, डोकीवरचे केससुद्धां भीतीनें ताठ उभे राहिले असावे, असे मला वाटले. डोळ्यांची बुबुळे गर्रकन फिरल्याचा भास झाला. सर्वांगाला घाम सुटला व हातपाय लटलटां कापूं लागले. कोणास हांक मारीन तर बोबडी वळली. अशी माझी दशा कां झाली व मी एवढा कां घावरलों हें माझें मलाच सांगतां येईना. पण घाबरलों खरा. भीतीनें माझी अशी गाळण झाली आहे