पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
चांदण्यांतील गप्पा

फुलांचा घमघमाट सुटला होता. प्राणिमात्र निद्रासुखाचा अनुभव घेत होता. जीवांबरोबर जड अशीं घरें, दुकानें, डोंगर इही निद्रावश झाल्यासारखे वाटत. - जणूं प्राण्याच्यासारखे तेही 'जीवनार्थ कला ने थकून गेले आहेत ! देवदर्शन घेऊन घाटावर गणपतीचे दर्शन घेण्यास गेलों. मंद मंद वारा वाहात होता. नदीचे पाणी प्रशांत असावयाचें; पण वान्यामुळे त्यांत बारीक बारीक लाटा उठत होत्या. त्या असंख्य लाटांत चंद्राची प्रतिबिंब दिसत होतीं.- जणूं काय त्या आकाशस्थ थोरल्या चंद्राची हीं असंख्य बालके जलक्रीडा करीत आहेत ! केव्हां वाटे, असंख्य रत्नांचा रस करून तो ओतून दिला व त्याचाच हा गंगा- रूप प्रवाह वाहात चालला आहे. वारा मंद झाल्यावर घांटावरच्या देवळांचें, आकाशाचें, डोंगराचें, वृक्षवेलीचे पाण्यांत साफ प्रतिबिंब दिसे, तेव्हा ते फारच मनोरम वाटे; व मनांत येई कीं, बैकुंठ वैकुंठ म्हणतात तें हेंच असावें व श्रीविष्णूंनी वैष्णवांना वैकुंठीं जाण्यास लांब पडूं नये म्हणून श्रीकृष्णाबाईच्या उदरीत त्याची स्थापना केली असावी ! कृष्णेच्या पलीकडे डोंगरावर, वांईतल्या घरांवर, झाडांवर नजर फेकली असता ती सर्व पांढरी शुभ्र दिसत-जणूं काय रात्रिपति जो चंद्र त्याच्या आगमनसमयीं रोहिणीने असंख्य कामधेनूंच्या दुधानें त्याचे पाय धुतले होते, त्या दुधाचा लोट पृथ्वीवर येऊन त्यानें हीं घरेदारें, डोंगर, झाडे वगैरे पांढरी शुभ्र दिसत आहेत | अशासारखा सुंदर देखावा पाहात पाहात व त्यासंबंधानें बोलत वोलत आम्ही बाबासाहेबांच्या माडी- खाली येऊन थडकलों. आम्ही आपल्या बोलण्याच्या ऐनभरांत होतों तो माडी- वरून कधीं न ऐकलेले असे एका स्त्रीचे गोड शब्द कानी पडले. आम्ही दोघांनीं आश्चर्यचकित मुद्रेनें एकमेकांकडे पाहिले, पण काहींच बोललों नाहीं. मुकाट्यानें वाडयांत जाऊन निजलों.

 मी नांवाला अंथरुणावर जाऊन पडलों, पण काही केल्या झोंप कशी ती बिल- कूल लागेना. डोक्यांत त्या बाईबद्दलच विचार घोळत होते. गढीच्या पुढच्या दारावर पाहारा, मागल्या दोन्ही तिन्ही दारांना आतून कुलुपे, इतका बंदोबस्त असतो इतक्या रात्री बाबासाहेबांच्या माडीवर ही स्त्री आली कोठून ? गढी फार जुनी होती. तेव्हां कदाचित् तिला चोरवाट असण्याचा संभव आहे. पण ती कोणत्या बाजूने असेल ? ही चोरवाटेने येणारी स्त्री फार दिवसांची माहित-