पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

११.

 इतके बोलून परशुरामपंत तेथून चालता झाला. मी त्याच गोष्टीचा विचार करीत होतो आणि कांहीं वेळाने अंगरखा पागोटे घालून फिरावयास निघून गेलों; पण 'परशुरामपंतांनी सांगितली ही गोष्ट खरी असेल काय ! जे बाबासाहेव मला एवढे प्रतिष्ठित, सभ्य, मितभाषणी असे दिसतात त्यांना वाईट संगत लागणे शक्य आहे काय ? की लोक कांहीं तरी बोलतात ? इत्यादि विचार वारंवार मनांत येऊन माझें डोकें अगदीं भणभणून गेले. मी त् दिवसापासून त्या गोष्टीचा शोध करण्याचा निश्चय केला.

 एके दिवश दोन प्रहरी मी मधल्या दिवाणखान्यांत वाचीत बसलो होतों.. मुले खेळावयास गेली होती व माझी बायको दोनप्रहरची अंमळ लवंडली होती. इतक्यांत माडीवर कांहीं वाजल्याचा आवाज माझ्या कानीं आला. म्हणून मी तें काय आहे ते पाहाण्यास उठलों. तों स्वतः बाबासाहेब कोणाला तरी रागाने बाहेर घालवून देत आहेत असे ऐकूं आलें. मी जिन्याच्या तोंडाशी जातों तो नेहमीं येणारी गौळण भराभर पावले टाकीत घाबरलेली खाली येत आहे, व बाबासाहे बांच्या खोलींत ती पैसे मागावयाला गेल्याबद्दल तिला ते रागें भरत आहेत असें दिसकें. त्यांच्या बोलण्यावरून, तिने त्यांच्या टेबलावरच्या शिसवी पेटीला हात लावला, असें मला आढळून आले. कोणाला विचारल्यापुसल्याशिवाय ती खोलींत गेली म्हणून त्यांना तिचा संताप आला असावा असे वाटते.

 एका रात्री जेवणेखाणें झार्ली, मुलेही लवकर निजलीं, अर्धे पाहून माझी वायको म्हणाली, 'आज एकादशी. आहे-रास्त्यांच्या विष्णूला पोशाख फार नामी करितात. तर आपण तो पाहावयाला जाऊं. ' मी तिचे म्हणणे कबूल केलें. तिने तांदूळ, सुपाया, हळदकुंकवाची डवी घेतली, मी अंगरखा पागोटे घालून आलों, तिनें दारेंविरें लावून, उंदीर वात नेतील म्हणून दिव्यावर झाकण घालून मुलांना संभाळा म्हणून घरतिल्या स्वैपाकीणबाईला सांगून, ती व मी घरांतून बाहेर पडलों.

 शुद्ध पक्षांतील एकादशीची रात्र ! ग्रीष्म ऋतूंतील चांदणे फारच मजेदार पडले होतें. ठिकठिकाणच्या देवळातून भजनाचा सपाटा चालला होता. त्या भज- नांतल्या टाळांचा झणझणाट लांबवर ऐकूं येत होता. त्याशिवाय जिकडे तिकडे शांत व गंभीर झाले होतें. लोकांच्या घरांभोवती लावलेल्या फुलझाडांच्या.