पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

 गढींत जाऊन कोरडी चिरगुटें पांघरुणें आणतांना गड्यामाणसांनी बरीच धांदल केली. त्यामुळे अक्कासाहेब विहिरीत पडल्याची गुणगुण बाबासाहेबांच्या कानावर गेली. खरोखर काय प्रकार आहे तो पाहाण्याकरितां ते स्वतःच येण्यास निघाले होते; तोंच आम्ही गढत जाऊन पोहोचलों. त्यांनी मुलीला जवळ घेतले, तिचे चुंबन घेतलें,आणि मग तिला खेळावयास पाठविले. नंतर त्यानों मला आपल्या बसावयाच्या खोलीत बोलावून नेऊन झालेली हकीकत सांगण्यास सांगितले.

 बाबासाहेबांनी मला आपल्या खोलीत बोलावले यावरून मला मोठे आश्चर्य वाटले, व मजवर त्यांची एकदम वहाल मर्जी कशी झाली याचे मला मोठे गूढ पडले. मी त्यांच्या विश्वासाला पात्र आहे असे त्यांना आढळून आले असेल म्हणूनच त्यांनी मला खोलींत येण्याबद्दल सांगितले असावें; नाही तर त्या खोलीत जाण्याची कोणालाही परवानगी नसे. त्यांचीं जिवापलीकडे ठेविलेलीं अशी मुलेसुद्धां त्या खोलींत पाऊल टाकीत नसत. यामुळे त्यांच्या खोलींत जाण्याचा विशेष मान हा आपल्यालाच मिळाला असे मला वाटलें.

 या खोलींत भिंतीशी लहान टेबल, त्याचेजवळ खुर्ची, टेबलावर एक शिसवी पेटी, व टेबलावरच्या बाजूला भिंतीशी एका साधु पुरुषाची व एका सुंदर तरुण स्त्रीची अशा दोन तसविरी, तेलाच्या रंगांत काढलेल्या व मनुष्याच्या पूर्ण आंका- राच्या टांगलेल्या होत्या. दुस-या बाजूच्या भिंतीला एक साधूची तसबीर टांग- लेली होती. एवढेच काय ते तेथें सामान.

 ते त्या खोलींत वाचावयास वगैरे बसत म्हणून थोडींशीं पुस्तकेंहीं तेथें होतीं. टेबलावर जी पेटी होती ती मी अनेक वेळां पाहिली होती. बाबासाहेब कध कामाकाजाला बाहेरगांवीं गेले तरी ती पेटी त्यांच्याबरोबर असे. ते तिला अगदीं विसंबत नसत.

 खोलींत गेल्यावर, मुलगो कशी पडली, कशी काढली, वगैरे सर्व मी त्यांना सांगितले. व मुलीच्या जिवाला अगदीं भय नाहीं, आपण अगदों काळजी करूं नका, असें मी त्यांस खात्रीपूर्वक सांगितले. माझे बोलणे संपतांच त्यांनी मला निरोप दिला. मुद्द्याचें व कामापुरतेच बोलण्याची त्यांच्या तेथें वहिवाट असे म्हणून पूर्वीच मीं सांगितले आहे. तेव्हां मला लगेच निरोप मिळाला याचे मला अर्थातच नवल वाटले नाहीं.