पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

तोंडे करीत. असे निराळे बिव्हाड करून बाबासाहेबांच्या येथे शिकवावयाला सरासरी एक दोन महिने गेलो असेन. पुढे बाबासाहेबांच्या सांगण्यावरून मी आपले बिहाड त्यांच्याच वाड्यांत आणिलें.

 बाबासाहेबांनी मुंबईची वकिली बहुतेक सोडल्यासारखीच होती. एखाद्या कुळाच्या आग्रहावरून एखादे वेळीं ते मुंबईस अथवा इतर ठिकाणीं जात. एरवीं त्यांनी वांईत जमीनजुमला केला होता तेथेंच ते राहात. वाईत त्यांचें घर मेणवलीचे वाटेवर गांवच्या बाहेर एका उंचवटयाच्या मैदानावर होतें. बाबासाहेबांच्या वाड्याला बाहेर मोठा थोरला कोट असून त्याला बुरूज होते. वांई प्रांत त्याला सरदेसायांची गढी म्हणत. या गढीच्या बाहेरच्या कोटाच्या आंत बागशाई होती. मागल्या बाजूला तर चांगला मोठा मळाच होता. आतल्या बाजूला म्हणजे मुख्य राहात्या वाड्यांत चारी बुरुजांवर चार खोल्या व त्याच्या खालींही तशाच खोल्या होत्या. अतिला वाडा चौसोपी होता, व बुरुजाच्या खोल्यांना लागूनच चार मोठमोठी दालनें होतीं. पश्चिमेच्या बाजूच्या बुरुजावर वाबासाहेब बसत असत व त्याला लागूनच जें दालन होते त्यात त्यांचा पुस्तकसंग्रह असे. सर्वोत पुढच्या दालनांत बैठक घातलेली असे, त्या ठिकाणी ते आल्यागेल्याची व पक्षकारांची गांठ घेत. बाबासाहेबांच्या एकंदर पुस्तकसंग्रहाची किल्ली माझे - जवळ असे व तेथें बसून कायद्याचा अभ्यास करण्यास मला परवानगी होती.

 बावासाहेब सरदेसाई म्हणजे वाईतले चालतें बोलतें घड्याळच, असें तेथील लोक समजत. त्यांचें जेवण, स्नान, फिरावयास जाणे, वाचीत बसणे व निजावयाला जाणे या सर्व वेळा अगदी बांधून टाकलेल्या असत. त्यांच्या वसा- वयाच्या खोलीचें, वाचनगृहाचें, अथवा भेट घेण्याच्या दिवाणखान्याचे दार वाजलें कीं, अमुक वाजून अमुक मिनिटे झाली असे समजून त्या दाराच्या कर- करण्यावर आपले खिशांतले घडयाळ खुशाल लावावें ! एक सेकंडाचा देखील फरक पडावयाचा नाहीं. बाबासाहेबांचा फार वेळ सहवास आम्हां कोणालाच आवडत नसे. त्यांची वर्तणूक जरी अतिशय सभ्य व चाकरनोकरांशी त्यांचे वर्तन शांत असे, तरी त्यांचा तो दिखाऊ तिरसटपणा व मित भाषण यामुळे त्यांचा सर्वोस फारच वचक वाटे.

 पुस्तकालयाच्या अगदी शेजारीं, म्हणजे त्याला लागूनच, त्यांची खोली होती. मी पुस्तकालयात दोन दोन तास बसत असें, पण मला त्यांच्या खोलीच्या आंत