पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदण्यांतील गप्पा

वणीचे १० मिळत. त्यात आमचा दोघांचा संसार होत असे. पुढे वकिलीची परीक्षा देण्याचे मी मनांत आणले. पण वकिलीची परीक्षा देण्यास कायद्याचीं पुस्तकें पाहिजेत. त्याला किंमत अतिशय पडने. ती देण्याचे माझे अंगीं सामर्थ्य कोठचें ? तेव्हां एखाद्या वकिलाचा कारकून व्हावें असें मी मनांत आणिले. 'कार- कून ठेवतां काय ?" म्हणून मी रावबहादुरांना विचारण्यास गेलो. त्यांनी माझा अभ्यास पाहून व मी कशाकरितां कारकून राहाण्याचे पत्करीत आहे हे समजून घेऊन, मला त्यांनी आपल्या मुलांना शिकविण्यास ठेविले. त्यांना दोन मुलें होतीं. एक मुलगा व एक मुलगी. मी दोन तास शिकवी व बाकी फावल्या वेळांत त्यांच्या कायद्यांच्या पुस्तकालयांत बसून कायद्याचा अभ्यास करी. रावबहादुरांना घरी बाबासाहेब म्हणत. बाबासाहेबांच्या शरीराची काठी उंच असून हाड- पेर चांगले मजबूत होतें, रंग साधारण गोयांतला होता, नाक सरळ, भिवया झुपकेदार, डोळे खोल व बारीक, व मिशा वर पिवळलेल्या असत. बाबा- साहेबांकडे पाहिले म्हणजे हा गृहस्थ फार तिरसट असावा असे वाटे. त्यांना बोलणें भगर्दी थोडें हवें असे, व तेही अगद / मुद्द्याचें. मुद्द्याबाहेर एक अक्षर- सुद्धा बोललेले त्यास आवडत नसे. या सर्वोवरून ते खास तुसडे आहेत असे एकदोन वेळ ज्याने त्यांस पाहिले आहे अशा माणसास वाढल्यावांचून राहात नसे. पण खरोखर ते असे नव्हते. त्यांची वागणूक फार सभ्यपणाची व सरळ असे.

 त्यांचा मुलगा भय्यासाहेब अगदी आपल्या वडिलांप्रमाणेच निघेल असें त्याच्या लहानपणच्या वळणावरून दिसत असे. मुलीला अक्कासाहेब म्हणत. तिचा चेहरा फार सौम्य असे. ती नाकाडोळ्यांनी सुरेख व फार मनमिळाऊ स्वभावाची होती. बाबासाहेबांना या दोन अपत्यांशिवाय त्यांच्या जिव्हाळ्याचें असें कोणी नव्हतें. एवढेच नव्हे, पण या दोन अज्ञान मुलांचे संगोपन करण्यास कोणी बायको माणूसही त्यांच्या नात्यागोत्याचे नव्हतें. बाबासाहेबांच्या दिखाऊ तिरसटपणामुळे त्यांची मुले त्यांस भीत असत. त्यांचें त्या मुलांवर अतिशय प्रेम होते तरी तीं मुले त्यांच्याजवळ फारशीं जात नसत.

 मी दोन तास शिकवून लवकर घरी जाई. कारण घरी माझी बायको एकटीच असे. आणखी मी जेथें बिन्हाडाला जागा घेतली होती त्या जागेच्या आसपास ब्राह्मणांचा शेजार नव्हता. मी घरीं जाऊं लागलों म्हणजे दोन्ही पोरें एवढींशीं