पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

केशराचा सडा घालून प्रियपतीची वाट पाहात बसली आहे ! आमच्या या तपो- वनीत उभे राहून कोणीकडच्याही वाजूला व कोणत्याही वेळीं दृष्टि फॅकिली तरी देखावा मनोहरच दिसतो. आतां उन्हाळा सुरू झाल्यामुळे डोंगर अगदी रख- रखीत झाले आहेत. तरी मधून मधून कोठें हिरवळ दिसते. जसे एखाद्या श्रीमं- ताच्या घरावर दरवडा पडून सर्व नाहींसें होतें; पण कोठें कोनाकोपऱ्यांत एखादें फडताळ राहून त्यांत कांहीं खुर्दा, कांहीं दागिने चुकून शिल्लक राहावेत, तसें तें दिसतें. डोंगराच्या पायथ्यावरील वनभूमिका फारच नामी दिसतात. ती व उंच ताडाची झाडे डोकीवर हिरवा गार तुरा धारण करून उंचीच्या कामांत डोंगराशी जणों प्रतिस्पर्धा करीत आहेत असे वाटतें. लांब लांब पानांच्या हिरव्या गार केळी, लालभडक फुलांनी गजबजलेले पांगार, जीर्णपर्ण झालेले साग, पोपटी रंगाचे करंज, हिरव्या गार भेंडया, मोहोरलेले आंवे, लांब लांब दाढीच्या ऋषसारखे वड, ठेंगण्या करवंदीच्या जाळ्या व जमिनीवर व कुंपणावर पसरलेले वालांचे, घेवड्यांचे व रताळ्यांचे वेल, व झेंडूच्या फुलांचे वाफे, हे फार सुरेख दिसतात. जशी कांहीं डोंगरानें आपली ही संपत्ति चोरांच्या भयाने जमिनींत ठेविली आहे, किंवा त्यांच्या घरीं कांहीं कार्यप्रयोजन आहे म्हणून हिरवे शालू नेसलेल्या या वनभूमिका कार्यसिद्धि करण्यास चालल्या आहेत, असे भासते.

 आमच्या या तपोवनांत दोनतीन कुटुंबांचीच झोंपडी किंवा पर्णकुटिका आहेत. त्यांतील आम्ही सर्व माणसे एका कुटुंबांतल्यासारखीं वागतों. संध्याकाळी आमच्या पर्णकुटीसमोरच्या अंगणांत सर्व जण जेवणखाण उरकून येऊन बसतात, व गोष्टी सांगतात आमच्यापैकी एका गृहस्थानें गोष्ट सांगण्यास आरंभ केला. ते म्हणले:-

 तुम्हां सर्वोना, किंवा काही जणांना तरी, मुंबईचे प्रसिद्ध वकील राव- बहादूर गणपतराव सरदेसाई हे ऐकून ठाऊक असतीलच. मी वकिलीचा अभ्यास करीत असतो त्यांच्या मुलांना शिकविण्याचेंही काम करीत असें. माझी मूळची गरिवी होती. मला स्वतःचें कोणी नव्हतें व पैशाची मदत करण्यासारखे कोणी आप्तइटही नव्हते. अगदी पहिल्यापासून शिकवण्या पत्करूनच मी आपला अभ्यास केला. शाळेतील हुशारी पाहून माझ्या सांसयानें मेला आपली मुलगी दिली. ती मोठी होईपर्यंत त्याने तिला आपले घरींच टेवून घेतलें, व पुर्डे मोठी झाल्यावर मजकडे आणून पोहोंचविली. मला शिकून दहा रुपये मिळत व शिक-