पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदण्यांतील गप्पा

अमकी गरीबाची बायको होती, तमक्याची बायको बुडाली, फलाण्याची पोरें उघड पडलीं, अशासारख्या उद्वेगजनक बातम्या आणतात, व पुनः पुनः त्याच विषयांवर बोलत बसतात. त्यामुळे आमच्या सर्वोच्या मनाला उद्विग्नता मात्र येते. म्हणून मीं एक दिवस आमच्या एकंदर मंडळीला म्हटले की, आपण संध्याकाळी दररोज गोष्टी सांगून करमणूक करून आपल्या उद्विग्न मनांची शांति करण्याचा मार्ग काडूं. ही सूचना सर्वांना पसंत पडली. व रोज गोष्टी सांगण्याचे ठरलें. मी. त्यांच्या गोष्टी लिहून काढण्याचें पत्करलें. कारण मला गोष्टी सांगता येत नाहींत.

 प्यास लागणारा वाणीचा रसाळपणा माझ्या अंगीं नाहीं, व त्या सांग- तांना गोष्टीला तिखटमीठ लावून गोष्ट खुलवून सांगण्याचे चातुर्यही माझ्यामध्ये नाही. म्हणून मी हॅ मजुरासारखें लिहिण्याचे काम पत्करलें. देवानें चातुर्य व माधुर्य हे गुण जेव्हां आपल्या दरवारांत वाटले, तेव्हां माझ्या कमनशीवरूपि पाहारेकच्याने माझा त्या दरबारांत प्रवेशच होऊं दिला नाहीं. असो.

 आम्ही ज्या जागेत राहात आहों त्याचे आणखी थोडेंसें वर्णन देऊन नंतर आमच्यापैकी एका गृहस्थानें गोष्ट सांगितली ती देते.

 आमच्या समोरच सागरगडचा डोंगर दिसतो. एका बाजूस रामवरण आहे,. व उत्तरेच्या अंगास कनकेश्वरचा डोंगर आहे, व सह्याद्रीच्या एका लहान डोंग- राच्या पायथ्याशीं नदी तीरावर जुन्या आंब्यांच्या राईत आम्ही राहात आहो. या राईत आंव्याचे वृक्ष फार उंच उंच गेलेले आहेत, व त्यांच्या फांद्या एकमेकांत गुंतल्यामुळे वर नजर फेंकली असतां हिरवेगार व बुट्टीदार छत दिले आहे असे वाटतें. या ठिकाणी सकाळ संध्याकाळशिवाय सूर्याचा प्रवेश होत नाहीं. या राईत आमचीं गवताचीं झोपडी एखाद्या ऋषीच्या आश्रमासारखीं शोभतात. पूर्वेच्या बाजूला जी सह्याद्रीची ओळ आहे तिकडून सूर्य उगवला म्हणजे तो प्रातःकाळी फारच नामी दिसतो. जणूं काय जगच्चालक सुवर्णकार त्या डोंगराच्या मागल्या. बाजूला असून त्याने हा लाल तापविलेला सुवर्णगोल निवण्याकरिता पर्वतावर ठेविला आहे ! केव्हां केव्हां वाटतें कीं, सृष्टिदेवीचा हा कुंकुमतिलकच आहे, व केव्हां वाटतें कीं, सृष्टि व ईश्वर हीं रंगपंचमीचा रंग खेळत असून त्यांनी हा गुलाल गोटा फेंकून दिला आहे ! संध्याकाळी पश्चिमेच्या बाजूला पाहावें तो वाटतें कीं, सूर्यपत्नी आपल्या भ्रताराच्या आगमनसमयी आपले पुढले अंगण शृंगारून