पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिसवी पेटी

ण्यास प्रवृत्त झाले, असे पाहून विचारी नदी अतिशय संतापली. 'पित्याजवळ याचे गाणे सांगण्यांत कांहीं हांशीळ नाहीं. तो अगोदरच दुर्बल झाला आहे. त्याला या गोष्टीपासून अधिक ताप मात्र होईल-' असा विचार मनात आणून आपला प्रिय पति जो सागर त्याला तिनें सर्व हकीकत सांगितल्यावरून तो रागाने अत्यन्त क्षुब्ध झाला व कृतघ्न वृक्षांचा नाश करण्यास्तव सर्व वातावर- 'गांत त्यानें दंव व धुके पसरून दिले. दंव हेच सागराचें शापोदक होऊन तेणें- करून अनेक वृक्षांचें अनेक प्रकारें नुकसान झाले. कोमल हृदयांच्या आम्रवृक्षांचा मोहर गळून पडल्यामुळे ते रडूं लागले व त्यांच्या मधुरूप अ खालनी भूमि ओली चिंव झाली.

 पण या झाडीवरून गुंगत राहाणाच्या मधमाशा पाहा! कोणाचें कांहीं कां होईना, आपला मतलब साधला को झाले, अशा कांहीं व्यक्ति आपल्या पाहा. "ण्यांत येतात कीं नाहीं ? त्यांना काळ, वेळ, ठिकाण, कशाचाही विचार नसतो. फक्त त्यांच्या मतलबाशी गांठ पडली म्हणजे झाले. 'शेजारी कोणी दारिद्रयांत निमग्न असो, कोणी चोरांकडून लुटला जावो, कोणी शापदग्ध होवो, आपल्याला त्यांच्याशी काय करावयाचे आहे ? असा विचार करणाऱ्या मधमाशा आपल्या कामांत अगदीं गर्क आहेत. त्या आपल्या सकाळ संध्याकाळ या झाडावरचा थोडा, त्या झाडावरचा थोडा, गुं गुं गुं गुं शब्द काढीत, मथ गोळा करीत, इक- डून तिकडे तिकडून इकडे लगवणीनें जातांयतांना दिसत आहेत. किंवा असेही म्हटले तरी चालेल कीं, मधमाशा वस्तुस्थितीचा विचार करणाऱ्या असतात. झालेली गोष्ट जर काहीं पुन: परत येत नाहीं तर मग उगीच शोक करण्यांत अथवा तेंच तेंच घेऊन बसण्यांत तरी कोणता अर्थ आहे ? झालेलें नुकसान कांहीं भरून येत नाहीं, तेव्हां त्यातल्या त्यांतच काय होण्यासारखा आपला फायदा असेल तो करून घ्यावा, असे म्हणूनच जणों आंब्यांनी टाकून दिलेला मध जमा करण्यास त्या लागल्या आहेत !

 प्लेगमुळे आम्ही या अशा परिस्थितीचा अनुभव घेत अरण्यवासाचें व सृष्टि- सौंदर्याचें अशा प्रकारें सुख अनुभवीत असताही चित्तास स्वास्थ्य म्हणून वाटत नाहीं. कारण, रोज व्यवसायी मंडळी आपल्या व्यवसायासाठी प्लेगनें पछाडलेल्या ठिकाणी जाऊन येतात व संध्याकाळीं- हो लागली, ती मेली, त्याला 'सेग्रिगेट' केला,