पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चांदण्यांतील गप्पा

 पर्वताकडे दृष्टि फेंकेली असतां तो रखरखीत, झाड पान वेल यांविरहित उघडाबोडका दिसत आहे.जशीं शेजारी शेजारी दोन घरें असून एका घरावर दरवडा पडून किंवा त्यास आग लागून त्याचा नाश होतो, व दुसन्या घरीं अकल्पित कारणानें लक्ष्मीस ऊत येतो, त्याप्रमाणे वनभूमि न डोंगर या दोन शेजाऱ्यांची स्थिति भासते. संसारांत हा असाच नेहमींचा अनुभव आहे. एकाचा भाग्योदय होतो तोंच दुसऱ्याच्या विनाशकाळास आरंभ होतो. एक अत्यंत दरिद्रावस्थेतून निघून हत्तीच्या अंबारीत बसतो, तोंच दुसरा दारिद्र्यरूप पंकांत अशी दैवगति विचित्र आहे. थोरांना दारिद्र्य फार दुःख देतें. नेहमीं श्रीमंतींत व ऐपभारामांत वागलेल्याला दारिद्र्य आले असता त्याचे चाकरनोकर, आप्तइष्ट, सर्व त्यास सोडून जातात, व त्या दारिद्र्याचें दुःख तो बापडा एकटाच भोगीत असतो. त्याच्या निकटसंबंध्यांना त्याच्याप्रमाणेच दुःख होते; तथापि त्याला सोडून जाणे त्यांस भाग पडते.

 दरिद्री पुरुषाच्या कन्येप्रमाणे भासणारी ही नदी पाहा!आवला तरी भार पित्यावर कशाला टाकावा ?' असें मनांत आणून त्याचा निरोप घेऊन ती मोठ्या कष्टानें आपल्या पतिगृहाचा मार्ग कमीत आहे ! क्षीणतेमुळे मार्ग चालण्यास कठीण पडून ठिकठिकाणीं विचारी विश्रांति घेत घेत व दम टाकीत टाकीत चालली आहे, कोठें कोठें तर कोणा दुष्टापासून आपणास उपद्रव होऊं नये म्हणून ती दडपत व लपत चालली आहे, असे वाटत आहे. इतके करूनही बिचारीचें संरक्षण करण्यास अथवा तिचेबरोबर जाऊन तिला पतिगृहीं पोंचविण्यास कोणी नसल्यामुळेच जणों कोठें खड्ढयाचा, कोठें डबक्याचा, अथवा एखाद्या वांकणाचा तिनें आश्रय केला असतां, दुष्ट बगळे वाटमान्याचे महा नीच कृत्य अंगीकारून विचारीचे थोडेसे शिल्लक राहिलेले व तिचे फार आवडते असे मत्स्यादि अलंकार भराभर ओर- बाडून घेऊन तिला ताप देत आहेत ! ज्योस आपण आजपर्यंत जीवन देऊन प्रेमाने वाढविले व पोशिलें, ते तीरस्थ वृक्ष आपल्यास या संकटकाळी खास उप- योगी पडतील अशा आशेने त्यांच्या बुंधांचा आश्रय करण्यास जो ती विचारी गेली, तो तेही त्या दुष्ट बना लपण्यास आश्रय देऊन चारांना सामील झाल्याचें तिला आढळले. उपकारकवर संकट आले असता प्रसंगी उपयोगी पडणारा जगांत विरळा ! ज्यांवर आपण उपकार केल तच प्रसंगी आपणावर शस्त्र घर-