पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकांची पुरवणी.

 विविधज्ञानविस्तारांत गेल्या ५० वर्षांत अनेक उपयुक्त लेख येऊन गेले आहेत. त्यांतून निवड करून पुनर्मुद्रित करण्यासारखे

 लेख आहेत, आणि विस्ताराच्या ज्युबिली' उत्सवार्थ जे तीन ग्रंथ छापण्याचे काम सुरू आहे तें पुरें होतांच, या पुनरा- वृत्तीचे काम हातीं घेणार आहों. वरील इच्छेस अनुसरून बरेच दिवसांपूर्वी “ चांदण्यांतील गप्पा" छापण्यास घेतल्या होत्या, व त्या आतां वाचकांस सादर अर्पण करीत आहों.

 या गोष्टी स्वतंत्र पुस्तकरूपानें छापण्यास परवानगी दिल्याबद्दल आम्ही श्री. काशीबाईचे अत्यंत ऋणी आहे. तसेच आमच्या विनंतीस मान देऊन यांस “चार प्रास्ताविक शब्द"लिहून दिल्याबद्दल आम्ही रा. लक्ष्मणशास्त्री लेले यांचेही आभारी आहों.