पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

 'निबंधमाला' अस्तास गेल्यावर महाराष्ट्रांत जे मराठी वाङ्गय निर्माण झाले त्याच्याशीं हरिभाऊ आपटे व कानिटकरदंपती यांचा बराच निकट संबंध आहे. हरिभाऊ व कानिटकर यांचा ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम होता. हल्लीं काशीताई काशीक्षेत्री आपल्या ज्येष्ठ चिरंजीवाजवळ आहे. या आपला वेळ महाभारत- सारखे ग्रन्थ वाचण्यांत, कहान मुलांसुदा शिकविण्यांत व इतर लेखनांत घालवीत आहेत. त्यांचे हे पवित्र कार्य अखंड वालो, व महाराष्ट्रकुलवधूंना तें सन्मार्गदर्शक व कल्याणप्रद होवो, अशी प्रदर्शित करून हा लेख आम्ही संपवितो.

पुणे,
ता. २५ मार्च १९२१.


लक्ष्मणशास्त्री लेले,