पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

 इ. स. १८९८ सालीं रा. सा. कानिटकर अलीबाग येथे मुनसफ होते, त्या साली तेयें प्लेग होता. म्हणून अलिबागेजवळ खंडाळीच्या आंग्याच्या जुन्या बागेत ते राहात असत. तेथे असतां काशीताईंनी 'चादण्यातील गप्पा' लिहिल्या. यांतील पहिल्या गोष्टीचें नांव 'शिसवी पेटी' असे आहे. 'हिला रूपरेषपुरता एका इंग्रजी गोष्टीचा आधार आहे. बाकीच्या सर्व कल्पित आहेत. या गोष्टींत सृष्टीचीं वर्णने जागजाग आली आहेत, तीं फार सुंदर आहेत. यांत शाईचे सूक्ष्म अवलोकन व वर्णनशक्ति हीं स्पष्ट बतात विविध मानवस्वभावही त्यांनी चांगले रेखाटिले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये घेण्याचारखें कांहीं तरी तात्पर्य आहे. केवळ करमणुकी- दाखल अशी एकही गोष्ट लिहिलेली नाहीं. भाषा सर्वत्र सरळ, सुबोध, सरस व हृदयंगम आहे. 'शिसवी पेटी'तील बाबासाहेब व त्यांच्या सुशील पत्नी • यांच्यासारखी जोडपी संसाररंगभूनीवर मधून मधून चमकतात. 'मारुतीचा -प्रसाद' या गोष्टींतील दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम परिणामकारक वठले आहेत. आनंदाच्या पात्राच्या मिषानें सत्समागमाचें फळ दर्शविले आहे. आनंदा व तुळशीराम हीं परस्परविरोधी पात्रे उठावदार आहेत. 'वनवास' या गोष्टींतील मानाजीराव व चंपी हीं पात्रे सुंदर आहेत. अनंताचा समागम प्रथम अद्भुत रसाचा पोषक असून पुढे अस्पष्ट शृंगार व शेवटीं परिस्फुटित शांत यांत परिणत झाला आहे. 'सारसबागेतील मथुराबाईंचें चित्र अत्यंत करुणास्पद आहे. गणपति मंदिरांतील तिचें प्रथमदर्शन कादंबरींतील महा- श्वेतेचें स्मरण करून देणारे आहे. रघुनाथरावाने आपल्या सुशील पत्नीचा केलेला छळ अमानुष आहे. शेवटची गोष्ट 'लावण्यवती' आहे. या राज- कन्येवर जी संकटपरंपरा आली आहे तिचा शेवट तीव्र वैराग्यांत केला आहे ते योग्य आहे. स्वरूपसिंहाचे चित्रही रम्य आहे. त्याचें लावण्यवती वरील प्रेम स्थिर होतें. तेव्हां लावण्यवतीबरोबर तोही संन्यासमार्गाला लागावा हे साहजिक आहे. या गोष्टींत थोडेंसें अद्भुताचे मिश्रण आहे. एकंदरीत या पांच गोष्टी आबालवृद्धांस प्रिय होतील अशाच आहे. मुलामुलींना यांच्या वाचनानें करमणूक आणि बोध या दोहोंचा लाभ होईल.