पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )

वाटतें. रा. गोविंदराव यांना आपण जॉर्ज ईलियट व्हावे असे दिसतें. मी आपणांस जी जेन ऑस्टेनची उपमा देतों याचे कारण आपल्या भाषेचें अव्याजमनोहरत्व आहे. हे पत्र लिहिण्याचा मी अविनय केला नम्रता; परंतु याला दुसरे एक कारण झालें. रा. गोविंदराव यांनी बोलता बोलतां असे उद्गार काढले की, माझी पुणे वैभवांत दर महिन्यास प्रसिद्ध होणारी कादंबरी वाचून आपली स्वतांची कादंबरी पुरी करण्याचा हुरूप आपण सोडून दिला. असे करण्याचे कारण काय असेल ते मी आपल्या मानेला हव्या तशा चमक्या मारून भरधाव काढिलें, तरी देखील 974 वास्तविक पाहातां असे करण्याला काहीं एक कारण नाहीं. जर माझ्या कादं- बरीत गुण असेल, तर तसा किंवा कांकणभर जास्त वरचढ असा आपल्या कादंबरीत आहे. माझी तर आजमितीला खात्री आहे की, 'गृहसौख्य व सुखकर दरी' हे दोन भाग तुम्हांला जसे साधले आहेत तसे मला कधींही साघले नसते. राधाबाईच्या पात्रासारखे पात्र ज्यांनी निर्माण केले त्यांनी माझी कादंबरी वाचून हातपाय गाळणे अगदींच विलक्षण आहे ! अहाहा ! काय त्या राधाबाईची बोलणीं ! जुन्या काळच्या प्रेमळ सुशील अशा पोच नीचे चित्र मला दाखवा असे कोणी म्हणेल तर मी चटकन् त्यास आपली कादंबरी वाच म्हणून सांगेन " अशा रीतीनें हरिभाऊंनी या कादं- बरीचें कौतुक केले आहे. यावरून त्यांची सहृदयता दिसून येतेच; पण तिच्याबरोबर नवीन ग्रंथकर्त्रीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा कलही स्पष्ट होतो. रंगराव-कादंबरी 'मनोरंजन आणि निबंधचंद्रिका' या मासिकांत प्रथम थोडथोडी येऊं लागली. पुढे ते मासिक बंद पडले व कादंबरीही अपुरी राहिली. इ. स. १८९८ साली ती पूर्ण झाली, व १९०३ साली पुस्तक- रूपाने बाहेर पडली. काशीबाईंची प्रसिद्धी प्रथमतः या कादंबरीने झाली.. तिच्यांत डॉक्टर आनंदीबाईच्या चरित्रानें भर पडली. हे चरित्र वाचकांस फार आवडले. यामुळे काशीताईंची गणना ग्रंथकारांत होऊं लागली. इ. स. १८९८ सालीं काशीताईंनी कित्येक गोष्टी लिहिल्या. त्यांपैकी कांहीं विविधज्ञान विस्तारांत 'चांदण्यांतील गप्पा' या नांवाने प्रसिद्ध झाल्या. आतां त्याच गोष्टी एकत्र करून प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध होत आहेत.