पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
चांदण्यांतील गप्पा

करुन परत जाणे बरें नव्हे. तशानें तुझे हे हाल व तुझा हा अज्ञातवास कांहीं संपणार नाहीं. तर कांहीं तरी यत्न करून तुझो ही दीन स्थिति सुधरावी, व तुला पूर्ववैभवाने युक्त अशी पाहावी, याच हेतूनें मी गेलों. कांहीं निरोपविरोप पाठवावा तर तशा कामाम खात्रीचा माणूस आढळेना. आपण स्वतःच येऊन भेटावें तर सवड नव्हती. या सर्व कारणांनी मला येण्यास अवधी लागली की क्षमा कर. झाल्या गोष्टी त्या झाल्या. तुझ्या वडिलांनीं योजना केल्याप्रमाणें पण विवाहसौख्याचा अनुभव घेऊं. आतांपर्यंत जशी आपण परस्पर मित्रा- णे वागलों, तशींच यापुढेही आजन्म मैत्रींत घालवूं. पतिपत्नी यांच्या मैत्री- रखी उज्जल मैत्री जगांत दुसरी कोणती आहे बरं ? त्याचा आपण अनुभव घेऊं. माझ्या इतक्या दिवसांच्या आशेला आलेला मधुर फळांचा मला आस्वाद घेऊं दे. तूं जर ही अशी बैरागीण झालीस तर मलाही तोच पंथ स्वीकारावा लागेल; तेव्हां माझी विनंती अमान्य करूं नको. मी आपल्या दोघांच्या लग्नाची तयारीसुद्धां सर्व करून आलो आहे. आपण जाण्याचाच अवकाश. तेथले राजे- साहेब तुला आपली कन्या समजून कन्यादान करणार आहेत; तेव्हां हें वे सोड, आणखी चल मजबरोबर.

 लावण्यवती म्हणाली – “ मला आतां मनुष्याशी लग्न करणे नको. तो संसार नको - मला तो मायापाश नको. माझा पति तो गिरिधर गोपाळजी आहे. त्याची मी गृहिणी, तोच माझा साथी, तोच यजमान. सर्व कांहीं तोच आहे. त्या व्यतिरिक्त कांहीं नाहीं. " असे म्हणून ती खाली दिलेले पद्य गाऊं लागली:-

पद ( राग देस.)

मेरे तो गिरिधर गोपाला दूसरा न कोई ॥ धृ० ॥
मै तो आई भगत देख, जगत देख मोही ।
माता पिता भाई बंधु, संग नहीं कोई ॥ १ ॥
संत न संग बैठ बैठ लोक लाज खोई ।
अब तो बात फैल गई, जानत सब कोई ॥ २ ॥
जाकै शिर मोरमुकुट, मेरे पति सो ही ।
शंख चक्र गदा पद्मकंठ माळा सोही ॥ ३ ॥
असुवनजले सिंचि सिंचि, प्रेमवेल बोई,
मीराकी लगन लगी होनि होय सो होई ॥ ४ ॥