पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

१०३

 'तिच्या त्या तशा वागविण्यानेंच मला तो वाडा सुटला आणि सद्गुरु विरक्तीचे पाय लाधले. कैकयीनें हट्ट धरला नसता तर श्रीरामचंद्र वनवासास गेले नसते, व रावणादिकांसारख्या राक्षसांचा संहार झाला नसता. तसेच माझ्या संबंधानें घडलें. आई तशी वागली नसती तर मी या अरण्यात येऊन सद्गुरूचें उपदेशामृत प्राशन करून काम, क्रोध, मद, मत्सरादि राक्षसांना जिंकले नेसले तेव्हा माझी सावत्रआईच माझी आयगुरु आहे.

 “त्या धनाच्या मदांत व परिचारक समुदायांत असते तर मला त्या द घनाची केव्हाही आठवण झाली नसती. एवढेच नव्हे तर परमेश्वर म्हणून कोण या अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी व नियंता आहे हेसुद्धां मी जाणले नसतें.

 "मनुष्याचें जीवित किती अशाश्वत आहे, याचें उदाहरण माझ्या बाबांचा क्षणांत झालेला मृत्यु ! त्यापासून मी कांहींतरी धडा घ्यावा; पण माझ्या डोळ्यां वर भ्रमाचें पटल आले असल्यामुळे मला समजले नाहीं. पुन: मी वेडयासारखी आशा करीतच होतें कीं, तुझा तरी सहवास अखंड राहील, ही माझी वेडी सम- जूत आपली कायमच ! यानंतर आकस्मिक कारणाने झालेला मोगरीचा मृत्यु. त्या सर्व गोष्टी मी लौकर जागे व्हावे म्हणून परमेश्वरानें घडवून आणिल्या. ते सर्व माझ्या शिक्षणाचे धडे, मजकडून त्याने करून घेतले. आतां मला ते राज्य नको, ते वैभव नको, आणि तो संसार नको. त्या सर्वोचें भयंकर चित्र माझ्या डोळ्यांपुढे अजून उभे राहाते व अंगावर कांटा येतो. संसाराचें नांव घेतले कीं, अंगाला घर काँप होतो. मी आपल्या सद्गुरूचे पाय सोडून कोठे जाणार नाहीं. त्याच्या शीतल छायेला सोडून रखरखीत संसारूप उन्हांत जाण्याची माझी इच्छा नाहीं. त्याच्याजवळ राहून त्या कल्पवृक्षाची मधुर उपदेशरूपी अमृतफळे भक्षण करून अमर होण्याचे टाकून, त्या संसाररूप विषवृक्षाची फळे सेवून मरणाची इच्छा करणारा असा अभागी कोण आहे बरें ? मला तूं वैभवशाली हो म्हणत आहेस, पण मला वाटतें कीं, तूं मला सुळाची शिक्षा सांगत आहेस ! " इतका वेळ स्वरूपसिंह मुकाटचानें ऐकत होता. त्याच्या मनाची बहुतेक खात्री झाली होती कीं, ही कांहीं आतां वळणार नाहीं. तथापि कांहीं यत्न करून पाहवा म्हणून तो पुनः म्हणाला, " लावण्यवती ! मी जो गेलों तो प्रथम शिका- रीच्याच उद्देशाने गेलों; परंतु नंतर माझ्या मनास असे वाटले की, नुस्ती शिकार