पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

१०५

 "त्या माझ्या पतीच्या चिंतनांत व सद्गुरु विरक्तीच्या सहवासांत या देहाचें सार्थक करावयाचें, हा माझा कृतसंकल्प आहे; तेव्हां आतां माझ्यासाठीं तूं उगीच को आपला वेळ घालवितोस ? तूं आपल्या राजधानीस जा. मजपेक्षाही चांगली अशी तुला पत्नी मिळेल. तूं तिजर्शी खुशार आनंदानें संसार कर. मी लग्न करावें अशी परमेश्वराची मला आज्ञा नाहीं. मी हा असाच जन्म घाल- वाचा अशी त्याची इच्छा आहे, हे मी तुला सांगितलेच; तेव्हां त्याच्या इन् प्रमाणेच मी वागावें हे योग्य आहे.

 स्वरूपसिंह - पण ज्याने आजपर्यंत बहुतेक आपले आयुष्य तुझ्या सहवास घालविलें तो मी दुसऱ्या स्त्रीशीं विवाह करून सुखी होईन काय ?

 लावण्यवती-तूं मानलेंस म्हणजे सुख होईल. सुखदु:ख हे केवळ मानण्या- वर आहे.

 स्वरूपसिंह – पण तसा मला अनुभव आला पाहिजे.
लावण्यवती-अनुभव घेऊन पाइा !

 स्वरूपसिंह – मी आजपर्यंत तुजवांचून अन्य स्त्रिया मातेप्रमाणे मानल्या आहेत, तेव्हा मला दुसरी स्त्री कशी करितां येईल ?

 लावण्यावती– मी तर जगांतील सर्वच पुरुष पित्याप्रमाणे व बंधूप्रमाणे मानले आहेत. तेव्हां मग कसा विचार ?

 स्वरूपसिंहास या उत्तराने काय बरे वाटले असेल ? आजपर्यंत मोठमोठया मनोराज्याच्या इमारती त्यानें उठविल्या होत्या व त्यांच्या अगदीं उंच शिख रावर आरूढ होऊन तो भावी सुखाने आनंद पावत होता. यत्नाने आपली प्रिया खास वळेल अशी त्यास मोठी आशा होती; परंतु तो सर्व एकदम लयास गेली. तो त्या हवेंत बांधलेल्या राजवाड्याच्या शिखरावरून एकदम खाली पडला व निराशारूप नदीत सांपडून विचारा गटंगळ्या खाऊं लागला ! कांहीं वेळ स्तब्ध वसल्यावर तो पुन: म्हणाला: – 'लावण्यवती, शेवटीं झालाच का तुझा निश्चय कायम ?
 लावण्यवती - ( शांतपणे ) हो !