पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
चांदण्यांतील गप्पा

व दुसऱ्या एका शिलातकडे बोट दाखवून त्यावर स्वरूपसिंहास वसावयास सांगितले. स्वरूपसिंह त्या दगडावर बसल्यावर मोठ्या गोड प्रेमळ मंदवाणीनें ती त्याला म्हणाली:-

 “स्वरूपसिंहा, तू मला तुजवरोवर यावें अर्से म्हणतोस, परंतु मी आतां जः त्या तशा अशाश्वत क्षणभंगुर सुखाची आशा धरून तुजबरोबर यावे अशी जगन्नियंत्याची इच्छा नाहीं. संसार किती दुःखमय आहे, वैभव किती घातक ,लक्ष्मी व जीवित किती क्षणभंगुर आहे, याचा अनुभव मला त्या दया- घनाने अल्पकाळांत व अल्पवयांतच दिला.

 “माझ्या नशिवीं राजलक्ष्मी, वैभव वगैरे काहीं एक नव्हते. परंतु त्यांची प्राप्ति झाली असतां मनुष्याला किती धोके आहेत, ते सर्व किती घातुक आहेत, याचा मला अनुभव यावा म्हणूनच त्याने मला राजकुलांत जन्मास घातले, आणि अगदी लहानपणापासून त्याने त्या विषवृक्षाची कडू फळे मला चारली.

 धनामुळे, वैभवामुळे व राजलक्ष्मीमुळे मनुष्य परमेश्वरापासून दूर राहातो. तो धनांध व वैभवांध झाला असता आपल्या स्वामीला, आपल्या धन्याला कसा विसरतो, व तो त्या खोटया सुखाला कसा भुलून जातो, याचाही त्याने मला राजकुळांत जन्मास घालून अनुभव दिला.

 माझ्या बापाच्या मनांत मी वैभवयुक्त असावें असे होते. त्याने आपल्या कडून त्वरा करून माझ्या लग्नाची तयारी केली, व माझा संसारशकट नीट चालावा म्हणून त्यानेंच तुझ्या जोडीची योजना केली होती; परंतु सर्वसाक्ष परमेश्वराचा तसा हेतु नसल्यामुळेच त्याने एका क्षणांत बाबांना आपल्यापाशीं नेऊन तो बेत मोडून टाकला व माझ्या बंदीवासाची योजना केली.

 माझ्या परमपूज्य सापत्न मातेच्या कारागृहांत मी जर पडले नसते तर आतांचे हे सुखाचे दिवसही मला आले नसते. ती माझी माताच मला मूळ गुरु झाली. तिचे मजवर अतिशय उपकार आहेत. ती जर खोटया बेगडी प्रेमानें मजशीं वागती तर मला तो वाडा, ती राजधानी, ते वैभव यांपैकी काहीं सुटले नसते व माझ्या जन्माचें सार्थकही झाले नसते. मी अखंड जन्ममरणाचे फेरेच घेत बसले असते. म्हणूनच मजवर तिचे फार फार उपकार आहेत.