पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )


ताईंना पुष्कळ उपयोग झाला. 'रंगराव' कादंबरी काशीताईन इ. स. १८८६ त लिहिण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी डॉ. आनंदीबाईचें चरित्र लिहिले. या चरित्राच्या साधनाकरितां त्यांस अमेरिकेतील मिसेस कार्पेन्टर- बाई यांस इंग्रजीत पर्ने लिहावी लागली. या कामी गोपाळराव जोशी यांची त्यांना पुष्कळ मदत झाली. दुसऱ्या कांहीं प्रसंगी इंग्रजी लिहिण्याचे काम पडले तें त्यांनीं गोविंदराव व गोपाळराव यांच्या साहाय्याने पार पाडिलें. यानंतर इंग्रजी लिहिण्याचा त्यांचा व्यवसाय सुटला; पण इंग्रजी मात्र त्यांस अधिक नाद लागला. हे काम त्या मुख्य साह्याने करीत. 'प्राइड अॅन्ड ग्रेजुडिस' या कादंबरीचे कांही भाग त्यांनीं आपले चुलतबंधु रा. शंकरराव वापट यांच्या मदतीनें वाचिले. पुढे त्यांनी स्वतःच ही नवलकथा अनेक वेळां वाचिली. जॉर्ज ईलियट, मेरी कॉरेली, मिसेस् हेन्री वुड, लॉर्ड लिटन्, मेरिया एजवर्थ, इत्यादि नामांकित ग्रन्थ- कारांच्या कृति त्यांनी वाचल्या. शिवाय करमणुकीसाठी 'अरेबियन नाईट' त्यांनी चाळले. लॉर्ड लिटनचें 'नाइट अँड मॉर्निंग' त्यांस फार आवडले. मेरी कॉरेलीची शिवराळ पद्धत त्यांना पसंत पडली नाही. जेन ऑस्टेन व जॉर्ज इलियट यांच्या ग्रंथांवर त्यांचे कायमचे प्रेम बसलें. मिसेस् हेन्री वुड यांची भाषा त्यांस चटकदार वाटे; पण त्यांची कथानकें सारखेपणामुळे फार कंटाळवाणी वाटत.मराठी ग्रन्थांपैकी ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, वामनी प्रकरणे, हीं त्यांच्या विशेष आवडीचीं होती. त्यांतूनही ज्ञानेश्वरीवर त्यांची भक्ति अढळ झाली. परशुरामपंत गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोविंदशास्त्री बापट इत्यादिकांच्या भाषांतरकृति त्यांच्या अवलोकनांत आल्या. भांडारकरांची संस्कृत पुस्तकें शिकून त्यांनी काव्यनाटकांत थोडा प्रवेश केला. परंतु पुढे त्यांचा संस्कृताचा अभ्यास सुटला.

 या त्रोटक हकीकतीवरून वाचकांच्या एक गोष्ट मुख्यत्वेकरून लक्षांत येईल ती ही कीं, काशीताईचें शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितींत, विशेष- करून स्वतःच्याच परिश्रमानें झाले. यासंबंधानें काशीताई लिहितातः - "तिकडची तब्येत जाईल हा जो धाक होता तोच माझा गुरु झाला ! इतरा- जीच्या भीतीनेंच मला वाचण्याचा नाद लागला. " हे जरी खरे असले तरी