पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १० )

भारतसार, ब पेशवे - होळकर - पटवर्धन - शिवाजीमहाराज इत्यादिकांच्या बखरीही त्यांनीं वाचल्या. कांहीं मनोरंजक पुस्तकें व संस्कृत नटांचीं भाषांतरे त्यांस वाचावयास मिळाली; पण त्यांची वाचनाची जागा कोठीच कायम झाली, व वेळही डाळतांदूळ निवडण्याची ठरून गेली.

यानंतर गोविंदरावांचा कायद्याचा अभ्यास होऊन त्यांस मुनसफीची जागा मिळाली.नोकरीच्या जार्गी गोविंदरावांबरोबर काशीताई गेल्या.. काशीताई थोडा मोकळेपणा व सवड मिळू लागली. इ. स. रास त्या इंग्रजी शिकूं लागल्या. जेमतेम प्रायमर झालें. पुढे शिकविण्यास कोणी मिळेना. इंग्रजी शिकण्यासंबंधानें काशीताई म्हण- तातः “ तिकडची शिकविण्याची पद्धत म्हणजे कांहीं तरी मोटेंसें पुस्तक आपण वाचीत असावयाचे. त्यांतील जो भाग फार आवडला असेल तोच मला वाच म्हणून म्हणावयाचे. तो मला वाचतां आला नाहीं कीं, संतापून पुस्तकं परत घ्यावयाचें, व 'दगडास काय बोध होणार ?' असे म्हणून आपल्या कामास जावयाचें ? या शिकविण्याच्या रीतीमुळे माझी इंग्रजीत प्रगति कांहीं केल्या होईना. शिवाय लिहिणें, स्पेलिंग पाठ करणे, वगैरे तर मला मुळींच ठाऊक नव्हते. मीं आपल्या बुद्धीनें कांहीं वेडेंबांकडें लिहिलें तर तें वाईट असणारच. त्याचा परिणाम ती वही फाडून फेकून देण्यांत होई! कधींमधीं नीट सांगणेही होई. मराठीचा अभ्यास मात्र मी स्वतः पुढे चालू ठेविला. मला शुद्ध व वळणदार अक्षराचा जरी सराव झाला नाहीं तरी काल्पनिक लेख व निबंध लिहितां येऊ लागले. "
 डॉ. आनंदीबाई जोशी यांचे भ्रतार रा. गोपाळ विनायक जोशी यांचा गोविंदरावांशी परिचय झाला. तेव्हांपासून काशीताईंच्या इंग्रजीला आरंभ झाला. कै० इरिभाऊ आपटे काशीताईंना वडील बहीण समजत. इ. स. १८८६ च्या मेच्या सहाव्या तारखेला हरिभाऊंनी काशीताईंना पहिलें पत्र लिहिलें. हा पत्रव्यवहार पुढे कित्येक वर्षे चालू होता. हा आमच्या हस्तगत झाला असून लवकरच प्रकाशित होण्याचा संभव आहे. या पत्रव्यवहारात काशीताईंच्या इंग्रजी अभ्यासाचा उल्लेख आहे. हरिभाऊंनी इंग्रजी कसें शिकावे याच्या संबंधाच्या केलेल्या सूचनाही त्यांत आहेत. त्यांचा काशी--