पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

१०१

ती आतां सर्व थोडथोडें करूं लागली. ती आपले गतवैभव सर्व विसरली. एवढेच नव्हे, तर आता त्या वैभवाची आठवण झाली म्हणजे तिच्या अंगावर कांटा उभा राही ! तिला तें अति भयंकर, प्राणघातकी सदा चिंतानिमग्न करणारें कपटजाल असे वाटू लागले. गुरुसेवा व वद्भक्ति यांतच तिला परमावधीचे समाधान वाटू लागले.

 स्वरूपसिंह आला त्याचे दुसरे दिवशी संध्याकाळी ती हातांत कमंडल घेऊन नदीवर पाण्याला चालली असतां, स्वरूपसिंह तिच्याबरोबर नदी, गेला. ती पाणी भरून खडकावर थोडा वेळ उभी असतां तिला तो म्हणाला !!

 “लावण्यवती ! उद्या सकाळी आपणा सर्वोचा जाण्याचा वेत करूं ना ? त्यावर लावण्यवती कांहींच बोलली नाहीं. तिनें ते दोन्ही कमंडलु उचलून घेतले व ती चालू लागली. तिच्याबरोबर स्वरूपसिंह चालू लागला. त्यानें कमंडलु आपण घेतों म्हणून सागितलें; पण ती तो देईना. तीं दोघें मठीकडे चालली असतां स्वरूपसिंह शिकारीस गेल्यापासून आपली हकीकत पुनः सर्व तिला सांगत होता. ती खालीं मान घालून मंद मंद पावले टाकीत चालतां चालतां. ऐकत होती. तो म्हणाला:- " तुझा हा अरण्यवास सुटावा, तुझ्या बापाने ज्या स्थितींत तुला ठेविली होती तिच्या जवळजवळ तरी तुझी स्थिति पुनः यावी व तूं पूर्ववत् सुखांत राहावेंस, म्हणून मी फार खटपट केली, आणि त्या खटपटीस दिनावधि लागल्यामुळेच माझें लौकर येणें झालें नाहीं; त्यामुळे येथे तुझे फार हाल झाले. मोगरीच्या मरणामुळे तर तुला असल्या निर्जन अरण्यांत एकटीला काळ कंठावा लागला, याची मला क्षमा कर. हा जोग तूं सोडून दे. आपल्या पूर्ववैभवाचा अनुभव घे. राजधानीस जाऊन लग्न करून आपण उभयतो सुखासमाधानांत काळ घालवूं. ती पालखी, त्या दासदासी, वगैरे सर्व वैभव तुजकरितांच आणिलें आहे. तुला हे कमंडलु हातांत घेऊन पाणि आणतांना पाहिले म्हणजे माझे हृदय विव्हळ होतें. तर आतां कृपा कर. हे मजशी धरिलेलें मौन सोडून दे. मी सहस्र अपराधी आहे. मला क्षमा करणे तुजकडेच आहे. याप्रमाणे त्याचे बोलणें चालणे असतां लावण्यवती ने शांतपणानें ऐकत होती. शेवटीं मठीच्या मागल्या बाजूला ती पोहोंचली. तेथें तिनें कमंडलु ठेवले, व डोळ्यांवर वान्याने उडून आलेले केश सांवरून आपण एका शिलातलावर बसली