पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
चांदण्यांतील गप्पा

ती सारखी गातच होती. कांही वेळानें स्वरूपसिंहाचा लवाजमा आला, तेव्हां गेला तंबू कोठे ठोकावयाचे वगैरे सांगून सर्व व्यवस्था लावून परत मठींत आला. तरी गाणें व भजन चाललेच होतें. इतका वेळ बसून गाणे चालले होते. आतां ती उठून उभी राहिली होती. एका हातांत एकतारी व एका हातांत चिपळ्या घेऊन भजन करून गुरुपुढे नाचत होती. हा कम बरीच रात्र होईपर्यंत चालला होता. स्वरूपसिंहही तेथेंच बसला होता. शेवटीं बरीच रात्र झाल्यावर तिने आपले भजन आटोपले. एकतारी खालीं विली, गुरूच्या पायांवर मस्तक ठेविलें; आणि मग कांही वेळाने स्वरूपसिंहा- कडे बळून म्हणालो: ‘बरा आहेस ना स्वरूपसिंहा ? ' असे म्हणून पुन्हा गुरुकडे तोंड करून व मांडी घालून, दोन्ही हात जोडून, खाली मान घालून बसली. नंतर गुरु व स्वरूपसिंह यांचेंच भाषण चाललें होतें. तेथून निघून गेल्यापासून घडलेली सर्व हकीकत त्यानें गुरूंस कळविली व गुरूंनी तो गेल्यापासून काय काय घडलें तें सांगितले. मोगरीच्या मरणाची वातमी ऐकून त्यालाही फार वाईट वाटले; व घोडे मोकळे कां ? - या प्रश्नाचेही आपोआपच त्याला उत्तर मिळाले. त्याने आपला हेतु गुरुचरणी निवेदन केला. दोघांचें भाषण होत असतो लावण्यवती खालीं मान घालून एकाच स्थितींत ऐकत होती. तिनें एकवारही वर मान केली नाहीं किंवा स्वरूपसिंहाकडे वळून पाहिले नाहीं. ती निवांतपण ऐकत होती. शेवटी अतिशय रात्र झाली म्हणून स्वरूपसिंह आपल्या तंबूत निजावयास गेला व ही गुरुशिष्यांची जोडी तेथेंच मृगाजिन व धावळ्या यांचे अंथरूण करून निजली.

 लावण्यवती मठीत आल्यापासून गुरूचे बहुतेक काम ती एकटी करी. पहांटेस उठून मठीची झाडलोट, सडासंमार्जन करणे व गुरूच्या कफन्या व भगवी वस्त्रे धुणे, झाडोस पाणी घालणे, एखादे वेळ कंदमुळे शिजविणे, वगैरे बहुतेक कार्मे ती करी. प्रथम तिला ती सर्व कामे मोठीं कठीण गेलीं. मग पुढे पुढे कांहीं येऊं लागलीं. थोर कुलांतली ती, तिला कधीं आपलें वस्त्रही स्वतः नेसावयाचें ठाऊक नसे ते नेसवण्यास सुद्धां दासी उभ्या असावयाच्या. तेव्हां तला वस्त्र धुर्णे कोठून ठाऊक असणार ? पाणी पिण्याचे भांडे उचलावयाचें जिला मिाहीत नाहीं, तिला नदीचे पाणी कसे आणतां येणार? पण प्रसंग पडल्यामुळे