पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

९९

होती तिच्या दाराला गवती झांपड लावून बंद केली होती. म्हणून तो साधु- महाराजांच्या झोपडीकडे वळला. मठीच्या दाराजवळ जाऊन वांकून दारांत डोका- चतो तोंच समोरासमोर गुरुशिष्याची जोडी बसलेली प्रथम लावण्यवतीने घर सोडते वेळी मर्दानी पोषाख घेतलेलाच होता; परंतु तो राजवैभवयुक्त होता. आणि आतांचा मर्दानी खरा पण विरक्तिदर्शक होता. तिनें अंगांत पायघोळ भगवी कफनी घातली होती. ती शुभ्रवस्त्र नेसली होती. गळ्यांत रुद्राक्षांची कुंडलें घातली होती. एका हातांत एक मनगठी होती. कदाचित् ती स्मरण असून गायनवादनाचे वेळी हातांत अडकविली असेल. सर्वोगाला भस्म लाविले होतें. केसांस कर्धी तेलफणी न मिळाल्यामुळे त्यांच्या जटा वळून ते धूश्वर रंगाचे झाले होते. त्यांचा जूट बांधला होता. अशी ती लावण्यवती तिच्याच पोषाखाचे व तिच्याच चेहन्याचे थोडें थोडें साम्य असणाऱ्या व जवळजवळ समवयस्क अशा गुरूच्या पुढे अतिमधुर गात बसली होती.

 बापाच्या वेळी तिनें गायनकला व वादनकला साध्य करून घेतली होती. बाप मेल्यापासून तिनें कधीं गायन केले नव्हते किंवा विणावादनही केले नव्हते. ती आतां गुरुप्रसादाने सर्व काळजीपासून मुक्त झाल्यावर या झोपडींत गाऊं लागली. विणा कोठून आणील बिचारी ? पण गुरूंनी तिला एक एकतारी दिली होती, त्यावरच ती गात असे.

 लावण्यवती ते पद घोळून घोळून म्हणत होती व गुरूजी ऐकण्यांत अगदी तल्लीन झाले होते. भक्तिप्रेमाने दोघांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. अशा समय स्वरूपसिंहानें पायांतील चढाऊ कलाबूत लावलेला जोडा मठीबाहेर काढून ठेवला व तो आंत जाऊन बोवाजींस नमस्कार करून बसला.

 लावण्यवतीचा पोषाख, तिच्या हातांतील ती एकतारी, बसावयाला घेतलेले मृगाजिन, आणि जवळच पडलेल्या चिपळ्या व हातांतली रुद्राक्षांची मनगटी पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. त्याचा कंठ भरून आला, डोळ्यांत अश्रु चमकू लागले. त्याने आपला शेला डोळ्याला लावला. एवढ्या वैभवशाली राजाची लाडकी कन्या या अशा स्थितीत पाहून त्याला अत्यंत दुःख झालें. स्वरूपसिंह जवळ येऊन बसला तरी लावण्यवतीनें हातांतली एकतारी खाली ठेविलो नाहीं, गुरुकडची दृष्टि फिरविली नाहीं, किंवा गाणेही थांबविलें नाहीं.