पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
चांदण्यांतील गप्पा

 त्या वेळी बरीच संध्याकाळ झाली होती. सूर्य नुक्काच मावळला होता. संघि प्रकाश जिकडे तिकडे शांतता भासवित होता. झाडेझुडपें, वेली सर्व मलूल झाल्यासारखी दिसत होती. अशा वेळीं स्वरूपसिंह एकटाच घोडा भरधाव फेंकीत आश्रमाकडे निघाला. बाकीचा लवाजमा मागून येत होता. त्याला वाटले की, आपण आतां जलद जाऊन आपल्या प्रियेला लौकर भेटूं. ती वाढ पाहून पाहून कृश झाली असेल, किंवा निराशही होऊन कोठें तरी जावयाचा त्रेचार करील. आपणावर ती फार रागवलीही असेल, तेव्हा लौकर जाऊन 'तिची समजूत करावी. असा सारखा विचार करीत तो मठीच्या मागील टँकडी- वर आला, तो तेथे त्यानें लावण्यवतीचा व मोगरीचा असे दोन्ही घोडे रानांत मोकळे चरतांना पाहिले. त्यांच्या अंगावर लांब लांब केस वाढलेले, अंगें धुळीने भरलेली व हाडे बाहेर निघालेलीं- असे ते मठीच्या आसपास चरतांना पाहातांच त्याचें काळीज चर्र झालें. हा काय ! प्रकार - लावण्यवती जिवंत तरी आहेना !- हे घोडे रानवटासारखे मोकळे कां ! -या शंकेनें त्याचे मन उदास झाले. माणसा- चीही चाहूल लागेना तेव्हा हा प्रकार तरी काय असावा असा विचार करीत तो मठीच्या जवळ पोहोंचला, तों बोवाजीच्या मठींतून लावण्यवतीचा मधुर स्वर ऐकूं आला. ती संध्याकाळी एकतारी घेऊन भजन व भक्तिवैराग्यपर पर्दे म्हणत बसली होती व गुरूजी ऐकत होते. ती म्हणत होती ते पद हैं:-

संगत संतनकी धरले । जनमका सार्थक कछु करले ॥ धृ० ॥
उत्तम नरदेह पाया प्राणी, इसका हित कछु करले ।
सद्गुरु शरण जाके बाचा जनन मरण दुर करले ॥ १ ॥
कहांसे आया कहां जावेगा, ये कछु मालूम करना ।
दो दीनकी जिंदगानी वंदे, हुशार होकर रहना ॥ २ ॥
कौन किसके जोरु लडके, कौन किसके साले ।
जवलग अपना पल्ला चढता तबलक मीठा बोले ॥ ३ ॥
कहत कबीरा सून भाई साधु, बार बार नहि आना ।
अपनी हित कछु करले प्यारे, आखर अकेला जाना ४ ॥

 स्वरूपसिंहानें आपला घोडा तेथें एका झाडला बांधला व जिकडून गाणे ऐकूं येत होतें तिकडे तो चालला. त्यांना स्वतः उतरण्याकरितां जी झोपडी त्यापूर्वी