पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
चांदण्यांतील गप्पा

आता हे पाय सोडून जायची नाही. मला तें राज्य नको, ते वैभव नको, आप्त- इष्ट कोणी नको. आपल्या उपदेशानें मला त्यांच्याबद्दल पूर्ण वैराग्य झाले आहे. तेव्हां आतां आजपासून मी आपली.' असे म्हणून तिने बोवांच्या पायांवर मस्तक ठेविलें.

 पहाटेचा समय पूर्वदिशेकडे थोडें तांबुस होऊं लागले होतें. सभोवतालच्या नांतून सुवासिक पुष्पांचा मधुर गंध जिकडे तिकडे पसरला होता. वृक्षांवर त्यांची फडफड चालली होती. उजाडेल केव्हा व आपण या वृक्षावरून त्या वृक्षावर उडून जाऊं केव्हां अशा उत्सुकतेने ते वारंवार पूर्वेच्या बाजूकडे पाहात, व त्यामुळे त्यांच्या पंखांचा फडफडाट होई.

 वरती आकाशांत तारकागण पश्चिमच्या वाजूला खाली वळला होता. त्यामुळे असे वाटे कीं, हा सर्व यात्रिकांचा मेळा महापर्वणीला तीर्थावर स्नानाकरितां घाटावरून उतरत आहे !

 अशा समयीं लावण्यवती व तिचे गुरु विरक्ति अशी दोनही माणसे सुखानें ईशस्तवन करीत नदीवर स्नानादि नित्यकर्मात गर्क झाले हे ते सर्व संसाराच्या यातायातीपासून मुक्त झाली म्हणून लावण्यवतीचें नांव मुक्ति असे विरक्तींनी ठेविलें. तथापि आपण तिचें पूर्वीचेंच नांव कायम ठेवूं. विरक्तीचें स्नान झाल्याबरोबर लावण्यवतीनें त्यांची कफनी; धोतर नदींत धुतले व आपलेही धुतले. वास्तविक आतापर्यंत वस्त्र कसे धुवावें हे तिला माहित नव्हते; परंतु मोगरीच्या मरणापासून तिला वस्त्र पाण्यांत कसेंबसें बुडवून पिळावे लागे; व त्याच्याप्रमाणें आपली व आपल्या गुरूचीं वस्त्रे तिनें धुतलीं. आपला व गुरूचा कमंडलु पाण्याने भरून गुरूपुढे खडावा ठेविल्या व त्यांची कुबडी खाकेत मारली, खांद्यावर धुणे टाकलें, व दोन हातांत दोन कमंडलु घेऊन गुरूच्या मागोमाग सुस्वर • गाणे गात गात ती मोठ्या आनंदानें मठीपाशी आली. छातीत कमंडलु घेऊन चढत चढत असतां तिला कितीदां तरी ते खाली ठेवावे लागले क कितीदां तरी दम टाकण्याकरितां उभे राहावे लागले. मधून मधून तिचे गुरु तिला म्हणतच होते, “ वेटा, आण, माझ्याजवळ दे कांहीं वेळ. तूं सुकुमार राजपुत्री | तुला असली कामे कोठून ठाऊक असणार. तीं तुला कशी करता येतील ? ” त्यावर ती म्हणे: “ महाराज, मी स्वप्नात राजकन्या झाले होतें, आतां जागृतींत