पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

९५

 'तूं कोण ? - आलीस कोठून ? - जाणार कोठे ? - याचा विचार कर. म्हणजे तुलाच वाटेल की, तुझें कोणी गेलें नाहीं, तुझे सर्वस्व त्या दायाधन, सर्वोतर्यामी चास करणाऱ्या परमेश्वराच्या पायापाशी आहे. तोच आपला आईबाप, बंधु, भगिनी, आप्तसोयरा, धनी, सावकार, ॠणी - सर्व कांहीं तो दयाघन राम आहे. त्याच्यासारखा अखंड सुख देणारा दुसरा कोण आहे ? त्याच्याइतका कृपाळू कोण आहे ? त्या करुणार्णवानें आपणास ही विस्तीर्ण पृथ्वी व अनं आकाश असें घर दिले आहे. या वृक्षावल्लींसारखों सोयरी संगतीस दिली आहे. तेव्हा त्याच्या कृपेने आपणास काय कमी आहे ?

 ‘संसारांत अबदीं, अंतीं, मध्ये सर्व दुःखच भरलेले आहे. त्यांत कोणालाही, केव्हाही आणि कोणत्याही स्थितींत सुख म्हणून नाहीं. मृग जसा पाण्याच्या आशेनें मृगजळाच्या मागें धांवत सुटतो, तसा मनुष्य नेहमीं खोटया सुखाच्या मार्गे धांवत असतो. तेव्हां लावण्यवती ! संसार हा दुःखमूळ आहे, असे तुझ्या लौकर अनुभवास आणून दिले, ही त्या कृपाळू परमेश्वराची तुजवर कृपाच समज आणि सावध हो. त्या कृगसागराला शरण जा. तोच प्राण्याचे दुःख निवारण करण्यास समर्थ आहे. त्यावांचून कोणी नाहीं. तो सर्वत्र भरला आहे. तो आपणास एक क्षणही विसरत नाहीं, किंवा आपल्यापासून दूर जात नाहीं. त्याची ती राजधानी अखंड आहे, तिला कोणी शत्रु नाहींत, तिजवर परचक्र येण्याची भीति नाहीं. तो जें राज्य देईल, तें अखंड, शाश्वत, आनंदपूर्ण असेच देईल. तेव्हां त्याला शरण जा, त्याची भक्ति कर, त्याची सेवा कर, त्यावर प्रेम ठेव, त्यांची कृपा संपादन केलीस म्हणजे तूं सर्व दुःखापासून मुक्त होशील. या अशाश्वताचा लोभ सोड. हे सर्व क्षणिक आहे.'

 हॅ बोबाजींचे भाषण ऐकून लावण्यवतीनें साधुमहाराजांचे घट्ट पाय धरिले. तिचा कंठ सद्गदित झाला. नेत्रांतून अश्रुधारा वाहूं लागल्या. अंग रोमांचित होऊन त्याला कंप सुटला. तिच्यानें कांहींच बोलवेना. ती तिची स्थिति पाहून बोवांनी तिला उठविली. नंतर काही वेळ गेल्यावर ती हात जोडून म्हणाली:- महाराज, मी आजपासून सर्वस्वाचा त्याग केला. आतां आपणच मला सर्व. हा देह मी आपणास अर्पण केला. माझे आप्त, इष्टमित्र, आई, बहीण, भाऊ, बाप सर्व आपण. आतां मला तारा अथवा मारा, वाटेल तें करा; पण मी कांहीं