पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांदण्यांतील गप्पा लोक अनेक वेळ भेटतात. कांही वेळ आपण व ते बरोबर प्रवास करतों, आणि मग ज्याला जिकडे वाट फुटेल तिकडे तो जातो. म्हणून आपण त्याबद्दल शोक करतो काय ? किंवा पावसाळ्यात अनेक प्रदेशांतली काष्ठे, पुराने तुडुंब भरून चाललेल्या नदीच्या प्रवाशत एकत्र जुळतात व कोहों वेळ तो एकत्रपणानेंच बाइत जातात, आणि एखादी मागून लाट आली कीं, ती सर्व विस्कळीत होतात.

 ‘या जगद्रूप धर्मशाळेतले आपण प्रवासी आहों. कर्मधर्मसंयोगानें ज्यांच्या ठी पड़ल्या ती माणसे आपापल्या मार्गाला लागली. आपणही एक दिवस शी आपल्या मार्गाला लागूं. त्या समोरच्या आम्रवृक्षावर उद्या सकाळी बघ- शील तर तेथें तुला फारच थोडे पक्षी आढळतील. ते आतां रात्रीच्या रात्र तेथें वस्तीला आले आहेत. रात्र संपली कीं, आपआपल्या मार्गाला लागतील.

 'तशी आपण माणसे या मृत्युलोकों निवान्याला या जगद्रूप महाप्रचंड वृक्षावर वसलेली पाखरे आहों. घटकाभर निवान्याकरितो एकत्र जमून बसण्याचा योग आला आहे. कार्यभाग झाला की, या पक्ष्यांप्रमाणे आपणही आपापल्या मार्गाला लागू.

 किंवा आपण प्रवासी आहों, व या देहरूप धर्मशाळा आहेत. आपण मुक्काम सोडल्यावर धर्मशाळा कांहीं बरोबर नेत नाहीं. त्या तेथल्या तेथेंच राहा- तात. तसा देहही येथल्या येथेंच राहातो. तूं म्हणतेस ' माझें हे गेले आणि तें गेलें. ' पण हा तुझा निव्वळ भ्रम आहे. पाहा या देहाला आपण माझा माझा म्हणत; पण हा माझा हात, माझा पाय माझा डोळा इत्यादि अवयव देखील त्याचे नाहींत. प्राणी जाऊं लागला म्हणजे तो देहही त्याच्याबरोबर जात नाहीं. मग आई, बाप, बंधु, भगिनी कोठून जाणार ? तेव्हां तूं माझें गेलें, माझें गेलें, म्हणत वेड्यासारखी काय बसली आहेस ? तुझी तूंच आहेस. तुझें कोणी गेलें नाहीं, आलें नाहीं. तुला ही परमेश्वरानें देहरूप नौका दिली आहे, तिच्यांत बसून व हरिनामाचें वल्हें घेऊन भवनदी उतरून पार हो. या संसाररूप गारोड्याच्या खेळाला भुलूं नको.नजरवंदीचा खेळ आहे. यांत जितकें सत्य आणि सुख वाटते तितकें खोटें आणि दुःखमय आहे. यांत खरें सुख केव्हांदी कशानेही मिळावयाचें नाहीं. नेहमीं प्राणी आशेनें त्याच्या मार्गे लागलेला असतो, व धांवतां धांवतां विचारा हाताश मात्र होतो.