पान:चांदण्यातील गप्पा.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

९३.

 हकीकत सांगत असतां पूर्वस्मरणानें लावण्यवतीला वारंवार दु:खाचे उमाळे येत, व ते ती मोठ्या कष्टानें दावून आपली हकीकत सांगे. शेवटीं स्वरूपसिंह तीन दिवसांनीं येतों म्हणून सांगून गेला, व ज्याच्या जिवावर आपण घरदार सोडलें त्यानेंही फसविलें, वगैरे सांगत असतां तिला अतिशय हुंदका आला. तिच्यानें बोलवेना, व ती आकाशाकडे डोळे करून एकसारखी रहुं लागली. तें तिचें 'दुःख पाहून सर्व संगपरित्याग केलेल्या बोवांनाही दुःख झालें, व त्यांचें अंतःकरण दयेनें द्रवले. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. तिला कवटाळून तिच्या तोंडावरून हात फिरवीत ते म्हणाले, " बेटा उगी राहा ! हा मृत्युलोक असाच दुःखदायक आहे. यांत प्राण्यांना परमेश्वरचिंतनाखेरीज सुख नाहीं. प्राण्याला सुख किंवा दुःख त्याच्या कर्माप्रमाणे प्राप्त होते. तेथे रडून काय होणार ? तूं असा विचार कर की, आजपर्यंत शाश्वत व अमर असे कोण झाले आहे ? तुझी आई गेली, बाप गेला. त्याप्रमाणेच त्याचा बाप, त्या बापाचाही बाप, व त्याचा वाप-अशी मार्गे मार्गे विचार करीत जाशील तर त्यांतून कोणी- सुद्धां राहिले नाही. मृत्यूच्या जवड्यांत सर्व गेले असेंच तुझ्या अनुभवास येईल. तूं म्हणतेस, 'माझा बाप फार मोठा पराक्रमी राजा होता. त्याचा सर्वत्र दरारा असे.' परंतु मृत्यूच्या दराच्यापुढे त्याचा दरारा कांहीं चालला नाहींना ? जेव्हां मृत्यूनें तुझ्या आईला त्याच्यासमोरून अचानक उचलून नेली, तेव्हा तुझ्या बावाचें कांहीं चाललें नाहींना ? त्या वेळीं तोही तुझ्याप्रमाणे इताश, निर्वळ, दीन होऊन रडतच बसला ना ? त्याचीच काय कथा !-पांडवासारखे लोकोत्तर वीर असतां मृत्यूपासून अभिमन्यूचे संरक्षण त्यांच्या ने करवलें नाहीं. अथवा श्रीकृष्णपरमात्मा सहाय्य असतां पांडवांनाही मृत्यु चुकला नाहीं, ते तुम्हां आम्हा पामरांची काय कथा !

 (लावण्यवती बोवाजीच्या समोर बसून बोवाजी काय सांगतात, तें एकाग्रतेनें ऐकू लागली. )

 बोवा पुढे म्हणाले, 'मुली ! मृत्युलोक ही एक धर्मशाळा आहे. तेथे अनेक. ठिकाणचे यात्रेकरू येतात, मुक्कामाला राहातात, व आपल्या पुढच्या मार्गाला लागतात. कोणी अल्प काळ राहातो, कोणी दीर्घ काळ राहातो; परंतु सर्व आप- आपल्या मार्गाला लागतात. आपण कोठें जाऊं लागलो तर मार्गीत अनेक तऱ्हेचे