पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
चांदण्यांतील गप्पा

व बऱ्याच लांवपर्यंत त्यांनी शोधलें. पण कोठें पत्ता लागला नाहीं. शेवटीं ते स्नान करून बाहेर आले, व त्यांनी लावण्यवतीस स्नान करून वर येण्यास सांगितलें. लावण्यवती मोगरीला उजून म्हणाली: ' अरे तूं आपले घरदार आप्तइष्ट सोडून या अभागी प्राण्याकरितां येथें आलास आणि माझ्या दुर्दैवानें तुझी अशी दुर्दशा केली ! सोवत म्हणून आला होतास ना ? आणि तूंही या दीनाला असल्या रण्यांत टाकून गेलास ? तुम्हां सर्वोनाच मजपासून त्रास झाला काय ? तुमचा बचा एकच विचार होता है जर मला कळते तर मी एकटीच कोठें तरी गेलें असते, किंवा देवा, बाबा, तुझ्याच मनांत माझे हाल हाल करावयाचे होते तर एवढ्या मोठया कुळांत आणि एवढ्या ऐश्वर्यात मला जन्म तरी कशाला दिलास ? एखाद्या भिकान्याच्या पोटीं जन्म दिला असतास म्हणजे कांहींच यातायात नव्हती. आणि एवढं दुःखही झाले नसतें. अरे मुरारी, आतां मी या मनांत एकटयानें कसा काळ घालवावा, कोणीकडे जावें, कोणाशीं बोलावें, कोण माझी तैनात करील ? मी कोणाच्या आश्रयानें राहावें ? याचा कांहींच विचार तुला नाहीं ! ' याप्रमाणे ती अतिशय विलाप करीत होती.

 तेव्हां साधुमहाराज जवळ येऊन लावण्यवीस म्हणाले- 'बेटा, तूं हा शोक व्यर्थ करीत आहेस. या तुझ्या रडण्याने झालेली गोष्ट परत का येणार आहे ? चल वर मठीत जाऊं. ' असे म्हणून त्यांनी तिचा हात धरिला. त्यासरशी ती उठून स्नान करून वर आली. मठींत गेल्यावर साधुमहाराजांकरितां कोणी शेतक-यांनीं दूध आणून ठेविलें होतें. त्यापैकी अर्धे दूध त्यांनी आपण घेतले व अर्धे तिला दिले. लावण्यवतीने त्यांतील फारच थोडें घेऊन बाकीचें परत केलें.

 दूध प्याल्यावर बोवाजींनी हळूहळू बोलण्यास सुरवात केली, व मोठया युक्तीनें तिची मूळ हकीकत विचारून घेतली. प्रथम ती सांगण्यास कांकूं करीत होती. शेवटीं बोवांनी तिला सांगितले की, ' या अरण्यांत तुला मी व मला तुं असे एकमेकांला सोबती आहोत. तेव्हां मला तूं आपली हकीकत सांग. नंतर एखादे दिवशीं मीही आपली हकीकत तुला सांगेन. मी तरी तुझ्याप्रमाणे संसारत्रस्त होऊन वनवास केला आहे. तेव्हां आपण समदुःखीच आहोत. करितां परस्परांची खरी माहिती परस्परांना असणे बरें. बोवांच्या या बोल- ण्याचा लावण्यवतीलाही खरेपणा वाटून, आपल्या जन्मापासून तिला जितकी माहिती होती. तितकी सर्व तिनें वोवांस सांगितली.