पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

९१

ती ज्या ठिकाणी बसली होती, व मोगरी स्नान करीत होती, तेथून डोंगर अगदीं 'जवळ होता. त्या नदीचा उगम त्याच डोंगरांत होता. व नदीचे पाट बांधून जवळपास लोकांनी आपल्या शेतांत पाणी नेलें होते त्यांपैकी एक मोठा पाट फुटून नदीला एक मोठा लोंढा आला व मोगरी त्यांत खाली वाहून गेली | प्रथम लावण्यवती आपल्या विचारतरंगांत गर्क असल्यामुळे ते तिच्या लक्षांत आले नाहीं; पण पाण्याचा खळाळ जास्त झाल्यामुळे त्या आवाजाने ती भानाव आली आणि नदीकडे पहाते तो मोगरी कोठे दिलेना ! ती अतिशय घाबरली. व स्वतः पाण्यांत उतरली, तो पाणी आपल्या डोक्यावर आहे अर्से तिला वाटले कोणाला हांक मारावी तर जवळपास कोणी दिसेना. रोज गुराखी या वेळी गुरे चारावयास येत असत, पण आज ते देखील कोणी आले नव्हते.

 एकटी विचारी !' हे देवा ! अरे देवा ! आतां मी काय करूं ? कोणाच्या साह्याने माझ्या मोगरीला पाहूं ? देवा ! कसा रे माझ्या हात धुऊन पाठीस लाग- लास' ? एक माझी मोगरी माझ्या जिवाला आधार होती, ती देखील कां रे तुला सहन झाली नाहीं ? माझे तुला हालच करावयाचे होते तर मी राजवाडाच सोडिला नसता. तेथेंच तुझ्या इच्छेप्रमाणें हाल सोसले असते. सुखाच्या पाठीस लागून मी हे अरण्य पाहिले, तरी माझ्या वांटयाचे दुःखै व हाल चुकले नाहीत ! देवा ! जगांत सुख सुख म्हणतात ते असेच सारे खोटें आणि मृगजलाप्रमाणे माणसाला फसविणारें असते काय ?" असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडतात न पडतात तोच, त्याला प्रत्युत्तरादाखल' होय. बाळे, जग या खोटया सुखा- च्याच मागे लागले आहे, आणि तेही तुझ्यासारखे वारंवार फसते आहे ! ' हे शब्द कोठून बरें आले ? असा विचार करून ती इकडे तिकडे पाहू लागली, तोच साधू महाराजांची मूर्ति हातांत कमंडलु घेऊन पाणी नेण्यास आलेली तिच्या दृष्टीस पडली.

 लावण्यवती, अंगातले कपडे सर्व भिजलेले, रडून रडून डोळे लाल झालेले, आणि मोगरीचा पत्ता लागत नाहीं व जास्त शोध करण्यास कोणाची मदत नाहीं म्हणून हताश झालेली, त्यांच्याजवळ आली, आणि मोठचा केविलवाण्या स्वरानें म्हणाली, ' महाराज, माझा मुरारजी या इथे अंघोळ करीत होता, तो कोठें दिसत नाहीं हो !'हे तिचे शब्द ऐकून साधुमहाराजांनी पाण्यांत उडी टाकली