पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
चांदण्यांतील गप्पा

पतीने व संपत्तीने सोडले. तेव्हा मी खरोखरीच अभागी आहे. 'अशा प्रकारें विलाप करीत ती पुरुषवेशांतच रानोमाळ हिँडे. केव्हां केव्हां वोवांजींच्या आश्रमांत जाऊन बसे, वोजींकडे पाहून तिचे मनांत येई, 'हे महाराज कितीतरी सुखी आहेत ! यांना आहे कांहीं मजसारखी काळजी ? देवा तुला जर इतक्या संकटांतून मला न्यावयाची होती तर या बोवांच्यासारखी को नाही केलीस ? एवढे वैभव, आणखी राज्य हे नुसते देखावे तरी कशाला दाखविलेस ? ' याप्रमाणे ती अत्यंत शोकाकुल होऊन इकडे तिकडे हिंडून, कोठे तरी बसून तरी निजून अथवा रात्रीच्या रात्री रडून, वेळ घालवी. मोगरीनें जवळच्या गांवांतून कांहीं धान्य, पीठ, तांदूळ आणून शिजवून तिला घालावें, पण तिने त्यांतून फारच थोडें खाल्ले तर खावें नाहींतर उपाशीं उठावें. ती वारंवार म्हणे, 'सख्या स्वरूपसिंहा ! असा जर तुला दगा द्यावयाचा होता, तर मला या अरण्यांत कशाला आणलेंस ? माझें त्या तुरुंगांतच काय व्हायचे ते झाले असते. मग मी आपल्या जन्मभूमीत तरी राहिले असतें. आता मी अबका कोठे जाऊं? काय करूं ? याचा कांहीं तरी विचार केलास काय? अरे तूं या जड पाषाणापेक्षांही निर्बुद्ध आणि निष्ठुर अरे निर्दया ! तुला माझ्या सध्यांच्या स्थितीचें कांहींच का वाटले नाहीं ? मला भूलथाप देऊन तुझ्यानें जाववलें तरी कसे ? हाय हाय ! आतां मी काय करूं माझ्या स्वरूपसिंहाला कोठें पाहूं ? देवा, त्याला आपल्या घरी तर नाहींना नेलास ? तो तेवढा तुला आवडला आणि मज अभागिला टाकलीस ? तुला न्यावयाचें होतें तर आम्हां दोघांना एकदमच न्यावयाचे होतेस. मी काय तुला जड झाले. अरे समदृष्टि काय तो तूं एक आहेस म्हणतात, तो तूंसुद्धा पक्षपाती आहेस हे मला आतां पक्कें कळले. तुला अत्यंत दयाळू म्हणातात; पण मला तर तूं अतिशय निर्दय वाटतोस. आम्हां माणसांचे तर असे धारिष्ट झाले नसते' याप्रमाणे ती किती तरी विलाप करी. कित्येक वेळ देवाला व आपल्या दैवाला शिव्या देई. कित्येक वेळ त्याची करुणा भाकी. अशा तऱ्हेने आणखी काहीं महिने लोटले.

 एक दिवस मुरारी ऊर्फ मोगरी नदीवर स्नानाला गेली होती. तिचे बरोबर लावण्यवतीही गेली होती. मोगरी खाली पाण्यांत स्नानाला उतरली, व लाव- ण्यवती कांठावर आपल्या देवाच्या वैचित्र्याबद्दल सचिंत विचार करीत बसली.