पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
चांदण्यांतील गप्पा

किरणें मात्र दाट पानांच्या फटींतून डोकावीत असत. त्या ठिकाणी जिकडे तिकडे शांत रस भरला आहे असे वाटे. झोपडीच्या आंत गेलें तर तेथेंहीं कांहीं फारसे सामानसुमान अथवा गडगळ नव्हती. एक दोन पोथ्या, एक भोपळा, पांढरी घोंगडी आणखी त्यांचे बसावयाचे आसन; ते असें:- खाली कुशासन त्यावर मृगाजिन, व त्यावर पांढऱ्या घोंगडीची घडी. त्यावर पद्मासन घालून बोवाजी बसले होते. त्यांच्यापुढे त्यांच्या गुरूची तसवीर होती, तिकडे त्यांची दृष्टि होती.

 बोवाजी कांहीं फार वयाचे दिसत नव्हते. त्यांचे वय पंचविशीच्या आंतवाहेर असावें असें वाटे. त्यांचा चेइरा वाटोळा उथळ होता. डोळे अगदी पारवे असून अतिशय तेजस्वी व मोठे होते. ओंठ लालभडक कोंवळे होते. अंगकांति सतेज, आणि बांधा सुबक होता. मुद्रा मोठी प्रसन्न होती. शरिरयष्टि कृश व नाजूक दिसत होती. बोवांच्या शिखेपासून नखांपर्यंत जर अवलोचन केलें, तर पाहा- णारीस हा पुरुष खास नाहीं, स्रीच आहे, असा भास झाल्यावांचून राहत नसे, आणि लावण्यवतीच्या मनासही हाच विचार एक वेळ झटका देऊन गेला. व लावण्यवतीच्या पोषाखावरून व चेहन्यामोहऱ्यावरून बोवाजीसही तिच्या- विषयीं तसाच भास झाला.

 लावण्यवती आंत गेल्यावर तिनें बोवाजीस दंडवत घातला व त्यांनी दाख- विलेल्या जागेवर ती बसली. दोघांनी एकमेकांकडे क्षेमकुशल प्रश्न केल्यावर बोवाजींनी आपला कोणीकडे जाण्याचा विचार आहे, या ठिकाणी किती दिवस राहाण्याचा हेतु आहे, वगैरे प्रश्न तिला केले. बोवाजी मधून मधून बोलत पुन: त्यांच्या त्या तसविरीकडे पाहात. आणि जरी बोलत असले तरी डोळे त्या तस बिरीवरून न हालवितांच बोलत. लावण्यवतीला त्यांच्याशी कोणत्या विषयावर व कसे बोलावें हें ठाऊक नसल्यामुळे भाषणाचा ओघ असा कांहींच जुळून येईना. लावण्यवतीला दरबारी भाषा ठाऊक व बोवाजींना अध्यात्म ठाऊक; त्यामुळे भाष- णाचा ओघ कसा लांबवावा है दोघांनाही कळेना. एकमेकांच्या मळ हकीकतीच्या गोष्ठी निघून संवाद लांवला असता; पण तसाही प्रकार घडून आला नाहीं.

 बोवाजी बोलूनचालून विरक्त. ते हिची मूळ हकीकत विचारतात कशाला ? लावण्यवतीच्या मनांत एक हजार वेळ आले असेल की, आपण यांना 'या अशा तरुण वर्यात वैराग्य घेऊन या निर्जन प्रदेशांत येऊन राहाण्याचे काय